Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीश्री. छ. उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

श्री. छ. उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

सातारा : भारतीय जनता पक्ष – शिवसेना, रिपब्लिकन पक्ष आणि मित्र पक्ष महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले आणि आणि सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे उद्या मंगळवार दि. 1 ऑक्टोबर रोजी विजय संकल्प रॅलीच्या माध्यमातून निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
मंगळवार, दि.1 ऑक्टोबर रोजी सकाळी ठिक 10 वाजता गांधी मैदान, राजवाडा येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जाताना ढोल-ताशाच्या गजरात भव्य मिरवणुकीचा प्रारंभ होणार आहे. त्यावेळी श्री. छ. उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमवेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील ना. शेखर चरेगावकर, भारतीय जनता पक्षचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, विनीत कुबेर तसेच पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद, सदस्य पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत आदींसह स्थानिक स्वराज संस्था, सहकारी संस्था यांचे सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
गांधी मैदान येथून सकाळी दहा वाजता ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक निघणार असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा सातारा लोकसभा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक अ‍ॅड. भरत पाटील तसेच महायुतीचे पदाधिकारी यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular