5 कोटी रुपये असल्याच्या माहितीवरून कारवाई
सातारा : कोरेगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार शशिकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मयूर देशमुख यांच्या सातार्यातील ठक्कर सिटी येथील फ्लॅटमध्ये सोमवारी मध्यरात्री भरारी पथकानी छाप मारुन त्यांच्या फ्लॅटची व गाडीची झडती घेतली असल्याचे मयूर देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. छापा आणि घेतलेली झडती याबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र पैसे सापडली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला निवडणुक आयोगाने 28 लाख रुपये खर्च मर्यादा घालून दिली आहे. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कोरेगाव विधानसभा मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असतानाच आ.शशिकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मयूर देशमुख हे वापरत असलेल्या बोलोरो जीप क्रमांक (एम. एच. 11 सी क्यू – 3802) या वाहनांमध्ये पाच कोटींची रोखड आहे अशी गोपनीय माहिती भरारी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे भरारी पथकाने सोमवारी मध्यरात्री वेशांतर करून सापळा रचत प्रथम आ.शशिकांत शिंदे यांच्या बंगल्याची टेहाळणी केली त्यानंतर त्यांनी आ. शशिकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मयूर देशमुख यांच्या सातारा येथील ठक्कर सिटीतील फ्लॅटची झाडाझडती घेतली. त्यावेळी मयूर देसगमुख हे आ.शिंदे यांच्या बरोबर कोरेगाव मतदार संघातील महत्वाच्या लोकांच्या गाठीभेटी घेत होते. मयूर यांना पथकातील अधिकार्याने फोन करून त्यांच्या सातारच्या घरी बोलावून घेऊन त्यांच्या घराची झडती घेतल्याचे मयूर देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले मात्र या झडतीत पथकाच्या हाती काही लागले नाही. या घटनेबाबत कोरेगाव निवडणूक विभागाने याला दुजोरा दिला नाही.
कोरेगावात जिरवा- जिरवीचे राजकारण
माण -खटाव पाठोपाठ राजकीय दृष्ट्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघ संवेदनशील समजला जातो. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार शशिकांत शिंदे यांना जेरीस आणण्याचे षड्यंत्र गेली काही वर्षे सुरू आहे. मात्र आक्रमक पवित्रा घेत शशिकांत शिंदे यांनी जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. या मतदारसंघातील निवडणूक दोन्ही नेत्यांनी प्रतिष्ठेची केल्यामुळे शशिकांत शिंदे यांना अडकवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यांचे स्वीय सहाय्यक मयुर देशमुख यांच्या फ्लॅटवर टाकलेली धाड ही जिरवा- जिरवीच्या राजकारणाचा एक भाग समजला जातो.
शशिकांत शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या फ्लॅटवर छापा
RELATED ARTICLES