Thursday, April 24, 2025
Homeठळक घडामोडीबाटो-बाटो और मलई खाओ! एवढेच कॉग्रेस-राष्ट्रवादीचे धोरण : नरेंद्र मोदी

बाटो-बाटो और मलई खाओ! एवढेच कॉग्रेस-राष्ट्रवादीचे धोरण : नरेंद्र मोदी

शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सडकून टिका
सातारा (शरद काटकर) : लोकसभेच्या आखाड्यातून पृथ्वीराज चव्हाण उलटे फिरले, शरद शरदराव आहेत ते राजकारणातील हवा जाणतात. ते मोठे खिलाड्डू आहेत, हे काम माझे नाही असे समजून त्यांनीही निवडणूकीतून माघार घेतली. आता त्यांना कॉग्रेस राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधकांनी सत्तेच्या काळात बाटो-बाटो और मलई खाओ! एवढेच धोरण अवलंबले असा हल्ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार व पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर चढवला. दरम्यान, आजपर्यंत भाजप शिवछत्रपतींच्या विचारांचा सदभावनेचा आणि सर्वधर्म समभावाच्या विचार धारेवर वाटचाल करत होता. आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, संस्कार शिकवण, जोपासत होतो आता आमच्या सोबत छत्रपतींचा परिवार आमच्या सोबत आहे. एक भारत, एकता भारत बनवण्यासाठी यामुळे आम्हाला ताकत मिळणार आहे. उदयनराजे व शिवेंद्रराजेच्या आजपर्यंतच्या मताधिक्याचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढा आणि भाजप सेना महायुतीचे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्यांनी विजयी करा असे आवाहनही त्यांनी केले.
येथील सैनिक स्कुलच्या मैदानावर झालेल्या महाजनादेश संकल्प सभेला सातारा लोकसभा पोट निवडणुकीचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले, व विधानसभेचे उमेदवार, श्री.छ. शिवेंंद्रसिंहराजे भोसले, मदन भोसले, महेश शिंदे, जयकुमार गोरे, दिगंबर आगवणे, धैर्यशिल कदम, शंभुराजे देसाई, यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय ंमंत्री रामदास आठवले, महिला आघाडीच्या निता केळकर, नरेंद्र पाटील माथाडी नेते, नगराध्यक्षा माधवी कदम, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर,चिटणीस मकरंद देशपांडे, राजू भोसले, सुनिल काटकर, आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना म्हणाले, आई तुळजा भवानी आणि शिवाजी महाराजांना माझा साष्टांग नमस्कार. या मराठीतील वक्तव्यानेच आपल्या भाषणाची सुरूवात केल्याने उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात त्यांचे स्वागत केलेे. मोदी म्हणाले, आज आपण मोठ्या संख्येने मला व माझ्या सर्व साथीदारांसाठी उपस्थित राहिलात त्यासाठी मी तुम्हाला वंदन करतो. तुमचा जोश उपस्थीती विरोधकांना धडकी भरावी अशीच आहे. उदयनराजेंचे बोलणे मला ेऐकावेसे वाटत होते. त्यांचा एकएक शब्द माझ्या ह्रदयापर्यंत पोहचत होता. सातारा ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, रामदास स्वामी, प्रतापसिंहमहाराज, सावीत्रीबाई फुले,क्रांतिसिह नाना पाटील, रामशास्त्री प्रभुणे, यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी आहे. स्वंर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या सारखा व्हिजन असलेला कर्तृत्ववान नेता याच मातीतून मिळाला. सातारा ही माझी गुरुभूमी आहे. खटावचे सुपूत्र स्व.लक्ष्मणराव इनामदार (वकिलसाहेब) यांनी माझी शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. आज जे काही मी करू शकलो, ते संस्कार मला माझ्या गुरूमुळे मिळाले हे सांगताना सातारची माती मला तिर्थ यात्रेसमान असल्याचा गौरवोद्गार त्यांनी काढले.
आज सुद्धा सह्याद्रीत सूर्य उगवतो तेव्हा हातात केशरी ध्वज घेऊन शिवाजी महाराज येत असल्याचा आभास होतो. आज पर्यंत भाजपकडे शिवाजी महाराजांचे संस्कार होते पण आता त्यांच्या संस्कारासोबत त्यांचा परिवार देखील आहे. संस्कार, परिवार , एकता, अखंडता, सर्वधर्म समभाव एक संघ भारत बनविण्यासाठी ही ताकत उर्जा मिळणार आहे. असे स्पष्ट करून मोदी म्हणाले. सातारा ही शुरविरांची भूमी आहे मिलिटरी अपशिंगे या गावाने राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी समर्पीत केले आहे. गेल्या पाच वर्षात केंद्र आणि राज्यात छत्रपतींचे संस्कार जपण्याचे काम केले आहे. सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्य दिले आहे. जे वाईट नजरेने बघतात त्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. सेनेला पाठबळ देताना अत्याधुनिक शस्त्रं,अस्त्रं,पुरवठा केला आहे. सैनिक हे सुरक्षिततेचे अतुट हिस्सा आहेत. महायुतीने हे निर्णय घेतले आहेत. हि वस्तुस्थिती असताना कॉग्रेस आणि राष्ट्रवादीने राफेल, 370 कलम तसेच सावकरांच्या च्या विरोधात अपप्रचारासोबत अफवा पसरवतात, बदनाम करतात. कॉग्रेस आणि राष्ट्रवादीला जनभावनाच समजत नसल्याची खंत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र आणि हरियाना या दोन राज्यांच्या निवडणूकीत त्यांना जनताच कठोर सजा देईल.
उस उत्पादक शेतकर्‍यांसाठी 60 लाख मॅट्रिक टन साखरेसाठी 66 हजार रूपये कोटींचे अनुदान दिले गेले. आता या पुढे शेतकर्‍यांनी साखरेवर अवलंबून न राहता इंथेनॉल निर्मीतीवर भर देण्यात येणार असल्याने शेतकर्‍यांची आर्थीक उन्नती होईल असे स्पष्ट करून मोदी म्हणाले, गेले 15 वर्षे विरोधकांनी सत्ता उपभोगण्याचे काम केले. 1914 साली कर्जरोखे काढून प्रकल्पांची कामे करणाचे धोरण अवलंबले सत्तांतरानंतर मात्र राष्ट्रवादी आणि कॉग्रेसने या फाईली साठवल्या विरोधकांनी फक्त बाटो- बाटो – बाटो मलई खाओ एवढंच काम केलं केंद्रात नरेद्र आणि राज्यात देवेद्र सरकारने छत्रपतींच्या सदभाव मार्गाचा अवलंब करून सबका साथ सबका विकास हा मुलमंत्र जपला. आता महामार्गाचे काम सुरू आहे. विकासाच्या नावावर राजकारण होत आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले. राज्य आणि केंद्रशासनाने गती दिली. रखडलेल्या योजनांना निधी उपलब्ध करून दिल्याने चालणा मिळाली. नदी जोड प्रकल्प हाती घेतल्याने आता निश्‍चित कौटूबिक व आर्थीक विकास होईल.
सातारा जिल्ह्यात कास पठार आणि वजराई धबधबा प्रसिध्द आहे. जिल्ह्याला निसर्गाची देणगी आहे. पर्यटनाला चालना मिळावी यासाठी प्रयत्न केले जातील. सातार्‍याला 15 देशातील पर्यटकांच्या यादीत आणले जाईल अशी ग्वाही मोदी यांनी दिली. यासाठी आपण माझ्यासाठी एक काम करायचे की उदयनराजे व शिवेंद्रराजे यांचे यापूर्वीचे मताधिक्याचे सर्व रेकॉर्ड बे्रक करत प्रचंड मतांनी विजयी करण्याचा विश्‍वास मतदारांकडून वदवून घेवून सर्वच उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले, साताराही क्रांतीकारकांची चळवळीची भूमी आहे. मोदींचे गुरू लक्ष्मण इनामदार हे सातारचे सुपूत्र होते, मोदींची दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे. शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा विचार केला. त्याच विचारधारेवर नरेद्र मोदी राजकिय वाटचाल करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रयत हेच कुंटूंब समजत होते. नरेंद्र मोदी देशातील प्रत्येक व्यक्तिकडे कुंटूब म्हणून पाहत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांना पोलादी पुरूष म्हणून संबोधले जात होते. नरेंद्र मोदी हे त्याच पध्दतीने आयर्नमॅन आहेत असे गौरवोद्गार काढून ते म्हणाले, कॉग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्तेचे केंद्रीकरण केले. सत्तेमध्ये असताना काँग्रेसमध्ये अहंकार होता. पश्‍चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला असल्याचा त्यांचा गैरसमज होता. दगडाला शेंदुर फासले तरी निवडूण येईल अशी वल्गणा ते करत होते. मोदी सरकारने मराठा समाजाला आरक्षण देवून न्याय दिला. या सर्व बाबी लक्षात घेता कार्यकर्त्यांच्या रेट्याने अवघ्या तीन महिन्यात मी लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा देवुन पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलो. सातार्‍यातील मेडिकल कॉलेज, कृषी विद्यापीठ, आयटी पार्क, उभारण्याबरोबरच जपान व अन्य देशात शेतकर्‍यांसाठी असलेली इर्मा योजना लागू करावी अशी मागणी त्यांनी केली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular