Thursday, June 19, 2025
HomeUncategorizedसातार्‍याला देशातील पर्यटकांच्या पहिल्या 15 डेस्टिनेशनच्या यादीत आणू, दोन्ही राजेंना रेकॉर्ड ब्रेक...

सातार्‍याला देशातील पर्यटकांच्या पहिल्या 15 डेस्टिनेशनच्या यादीत आणू, दोन्ही राजेंना रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून द्या : नरेद्र मोदी ; इतर सात उमेदवारांचा नामोल्लेख मोदींकडून नाही, सभेचे स्वरुप सबकुछ राजे

सातारा : सातार्‍यात पर्यटन विकासाला सर्वाधिक संधी आहे. त्यामुळे सातार्‍याला देशातील पर्यटकांच्या पहिल्या 15 डेस्टिनेशनच्या यादीत आणू, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. सातार्‍यात आज, लोकसभेचे भाजप उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची सभा झाली. या दोन्ही उमेदवारांना रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून देण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना केले. मात्र, मोदी यांनी इतर सात उमेदवारांचा नामोल्लेख सुध्दा केला नाही. याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. सबकुछ राजे असं या सभेचे स्वरूप दिसून आले होते.
यावेळी जनसमुदायाला मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले आहे. सातारा ही पराक्रमाची भुमी असुन मी साष्टांग दंडवत घालतो. सातारचा सत्कार मला परिचित असून उत्साह जोष विरोधकांचा होष उडवत आहे. यशवंतराव चव्हाणांची भूमी तसेच माझी गुरूभुमी आहे. खटावचे लक्ष्मणराव इनामदार हे माझे गुरू असून गुजरातमध्ये त्यांना आम्ही वकीलसाब म्हणत होतो. त्यामुळे तीर्थयात्रा समान ही माझी यात्रा झाली आहे. सह्याद्रीच्या रांगेतून जेव्हा सुर्य उगवतो तेव्हा शिवछत्रपती हातामध्ये भगवा घेवून येत असल्याचा भास होतो. त्यांच्या विचाराप्रमाणेच राष्ट्रवादाला प्राथमिकता दिली आहे. अपशिंगे मिलीटरी मधून राष्ट्ररक्षक तयार झाले आहेत. 370 व्या कलमाबाबत आफवा पसरवल्याबाबत सातारकरांना राग येत आहे. सातारच्या पोट निवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण हे निवडणुकीतून उलटे फिरले. शरद पवार निवडणुक लढवण्यास तयार नाहीत. शरदराव हे शरदराव आहेत ते बडे खिलाडी आहेत. त्यांना हावेचा रूख कळतो. महाराष्ट्राला महान बनविण्याचे मिशन सुरू केलेले आहे. कॉगे्रस व राष्ट्रवादीच्या काळात बाटो बाटो व मलई खावो हे धोरण राबविल्याची त्यांनी टिका केली.
उस उत्पादक शेतकर्‍यांसाठी 60 लाख मॅट्रिक टन साखरेसाठी 66 हजार रूपये कोटींची सबशिडी दिली. आता या पुढे शेतकर्‍यांनी साखरेवर अवलंबून न राहता इंथेनॉलचा वापर करावा असे सुचित केले. सर्वाधिक चांगली फुले कासला तर सर्वाधिक उंच धबधबा वजराईला आहे. हि दोन्ही ठिकाणे सातार्‍यातील आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी पुन्हा आणूयात आपले सरकार अशा घोषणा दिल्या. या सभेपुर्वी मोदींना भेटण्याची संधी मिळावी म्हणून हिदूस्थान शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे प्रयत्न करत होते. मात्र त्यांना व्हीआयपी कक्षमध्ये जागा देण्यात आली होती. महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहून मोदींंनी महिलांचे कौतूक केले. या सभेचे वैशिष्टय म्हणजे श्री.छ.उदयनराजे यांनी दिलेली तलवार म्यानासकट मोदींनी स्विकारली तर, शिवेद्रराजेंनी दिलेली तलवार म्यानातून काढून त्यांनी उंचावली यावेळी टाळयांचा कडकडाट झाला. यावेळी पंतप्रधान मोदींना 370 कमळांचा फुलांचा हार घालून, चांदीचे कमळ, शिवाजी महाराजांची प्रतिकृती शिवमुद्रा देण्यात आली. शिवेंद्रराजे भोसले यांनी रामदास आठवले, यांच्याकडे पाहत संगत मे आदमी अकेला होता है। सफलता मै दुनिया उसके साथ होती है. जिस जिस पर जग हसॉहै उसने इतिहास रचाया है अशी शेरेबाजी केली तर रामदास आठवले यांनी 22 तारखेला ढोल ताशे निं बाजे…निवडुण येणार आपले उदयनराजे ते नेते आहेत सातारमध्ये अत्यंत बाजे. का निवडूण येणार नाहीत उदयनराजे. अशी शेरेबाजी केली. तसेच देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी मी आहे आंबेडकर वादी असा उल्लेख करून युतीच्या उमेदवारांना निवडूण देण्याचे आवाहन केले. या सभेला प्रतिनिधीक स्वरूपात नरेद्र पाटील, धैर्यशिल कदम, महेश शिंदे, निता केळकर, कविता कचरे, पुरूषोत्तम जाधव, भरत पाटभल यांनी मनोगत व्यक्त केले. या व्यासपीठावर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे, युवा सेनेचे आदित्य ठाकरे, आरपीआयचे आठवले व रासपचे जानकर यांचे पोस्टर नसल्याने शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular