Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीवन्यप्रान्यांची तस्करी करणार्‍या आठ जणांना अटक

वन्यप्रान्यांची तस्करी करणार्‍या आठ जणांना अटक

सातारा : सांगली व सातारा जिल्ह्यामध्ये काही टोळ्यांकडून अंधश्रद्धेपोटी सदर वन्यप्रान्याची खरेदी करीत असलेची माहिती वन विभागाकडे प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने दि. 16 नोव्हेंबर 2019 रोजी आटपाडी तालुक्यातील खरसुंडी गावाच्या हद्दीमध्ये कारगणी रोड लगत वन विभागाच्या पथकाने सापळा रचून दोन इसमांना मांडूळ या सर्पाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असताना मांडूळ सर्पासह रंगेहाथ ताब्यात घेऊन अटक केली आहे.
सदर प्रकरणी विभागाच्या पथकांनी सांगली व सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून आज अखेर एकुण आठ इसमांना अटक करण्यात आली असून त्यांचेकडील माहितीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे – तानाजी मारूती चव्हाण रा.चिनके ता. सांगोला जि.सोलापूर (वय 50 वर्ष), शिवाजी सोपान बनसोडे रा.नाझरे ता. सांगोला जि.सोलापूर (वय 51 वर्ष), शाहरुख ऊर्फ नयन दावल सुभेदार रा.जवळा, ता. सांगोला जि. सोलापूर (वय 25 वर्ष), सलीम हुसेन मुजावर रा. इस्लामपूर ता. वाळवा जि. सांगली (वय 26 वर्ष), कुमार राजाराम ढोबळे रा. इस्लामपूर ता. वाळवा जि.सांगली (वय 26 वर्ष), प्रितम सतिश पवार रा. इस्लामपूर ता. वाळवा जि.सांगली (वय 24 वर्ष), प्रवीण उर्फ अमोल सुबराव रा. लेंगरे, ता. खानापूर जि.सांगली (वय 25 वर्ष), संजय ज्ञानू जाधव रा. लेंगरे, ता. खानापूर जि.सांगली (वय 28 वर्ष) वरील आरोपींकडून 1 दोन चाकी गाडी व 7 मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
सदर आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 व जैव विविधता कायदा 2002 नुसार कारवाई करण्यात आली आहे. आरोपीची वन कोठडीची मुदत संपलेवर वरील सर्व आरोपींना मा.न्यायालयाने जामीन नाकारून न्यायालयीन कोठडी सुनावली त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर येथे करण्यात आली आहे.
याबाबत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार अशिक्षित वर्गाबरोबर सुशिक्षित व व्यापारी वर्गामध्ये काही वन्यप्राण्यांबाबत अंधश्रद्धेतुन गैरसमज आहेत. या गैरसमजा मधून मांडूळ, कासव, घुबड इत्यादी वन्यप्राण्यांची तस्करी व त्यांना अवैधरित्या बाळगण्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये नवतरुण मुलांसोबातच व्यापारी व उच्च वर्गाय यांचा सहभाग असलेच निदर्शनास येत आहे. वन्यप्राण्यांची शिकार अथवा तस्करी बाबत कोणत्याही माहिती नागरिकांकडे असल्यास ती 1926 या वन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर कळविनेचे आवाहन वन विभागामार्फत करणेत आलेले आहे.
सदर कारवाई गजानन चव्हाण सहा.वनसंरक्षक( वनीकरण) सांगली यांचे मार्गदर्शनाखाली कु.सुप्रिया शिरागावे वनपरिक्षेत्र अधिकारी आटपाडी, श्री. सचिन ढोंबाळे वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक सातारा,श्री. युवराज पाटिल वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक सांगली तसेच फिरते पथक स्टाफ सातारा, वनपाल – गजानन भोसले, वनरक्षक- दीपक गायकवाड़, विजय भोसले, पोलीस हवालदार श्री. सुहास पवार, राजेश वीरकर व वाहनचालक श्री. दिनेश नेहरकर, फिरते पथक स्टाफ कोल्हापूर, सांगली यांच्या सोबतीने पार पाडली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular