परळी : गेल्या काही दिवसांपासुन उन्हाच्या तिव्रतेत वाढ झाली असल्याने दुपारच्या वेळेत उन्हाचा चटका घमाच्या धारा फोडुन जिवांची काहीली करत असतानाच शानिवारी दुपारी तिन वाजण्याच्या सुमारास कास परळी बामणोली परिसरात मेघगर्जनेसह वळीवाच्या पावसाने हजेरी लावल्याने परिसरात गारवा निर्माण झाला होता
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कास परिसरात पावसाचा थोड्याशा प्रमाणात शिडकाव झाला होता. शनिवारी सकाळपासुन कास बामणोली परळी परिसरात उन्हाची तिव्रता वाढली दुपारच्या वेळेत उन्हाचे चटके सोसवेणासे झाले असतानाच दुपारी तिनच्या सुमारास मेघगर्जनेसह गारांसह पावसाने सर्वत्र हजेरी लावली काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडल्याने सायंकाळी हवेत गारंवा निर्माण झाला होता.
अचानक आलेल्या पावसाने भाताचे तरवे भाजणार्या शेतकर्यांची व घरांची दुरुस्ती करणार्यांची व परिसरांत फिरायला आलेल्या पर्यटकांची पुरती तारांबळ उडवली मात्र पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
कास परिसरात वळीवाच्या पावसाची हजेरी
RELATED ARTICLES