ः सातारा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार ना. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ आज शुक्रवार दि. 19 एप्रिल रोजी सायं. 6 वाजता ओगलेवाडी येथील राजवर्धन हॉलमध्ये महाराष्ट्राचे महसुलमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, कृषी व पणन मंत्री ना. सदाभाऊ खोत, यांची जाहीर सभा होणार आहे.
यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्ष व भाजप प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले, भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप प्रवक्ते भरत पाटील, भाजपा उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्यासह प्रमुख पदाधिकार्यांची उपस्थिती राहणार आहे.
कराड-विटा मार्गावर ओगलेवाडी येथील राजवर्धन हॉलमध्ये शुक्रवारी दि. 19 एप्रिल सायं. 6 वा. होणार्या या सभेस शिवसेना-भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ आज मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री सदाभाऊ खोत यांची ओगलेवाडीत सभाकराड
RELATED ARTICLES