भुईंज : आज सायंकाळी 5 वाजनेच्या दरम्यान डी. मार्ट येथे झालेल्या अपघातानंतर पळून जाणारी इनोव्हा महामार्गावरील दुचाकी स्वरांनी पाठलाग करून आनेवाडी टोलनाक्यावर पकडली व चालकाला जबाब विचारत फैलावर घेत असतानाच मधल्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने आपण उच्चपदस्त पोलीस अधिकारी आहोत असे म्हणत हातात ओळखपत्र दाखवण्यास सुरूवात केली. याच दरम्यान, संबंधीत अपघातातील जखमीचे नातेवाईक या इनोव्हाजवळ पोहचल्यानंतर इनोव्हा भुईंज पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली. याच दरम्यान सातारा जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील भुईंज पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. काही वेळातच जलदकृतीदल व अन्य पोलीस फौजफाटा भुईंज पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. अचानक एवढा पोलीस फौजफाटा पाहून भुईंज परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.
दरम्यान घडलेल्या प्रकाराची माहिती भुईंज पोलीस स्टेशनमधून घेत असताना सदर इनोव्हा नंबर एम. एच.-09 ईई 0108 ही गाडी असून त्यामध्ये एक उच्चपदस्त पोलीस अधिकारी कोल्हापूर ते मुंबई असा प्रवास करत होता. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीसात झालेला असून इनोव्हाचे कागदपत्रे घेवून इनोव्हा मुंबईकडे रवाना झाल्याने जखमीच्या नातेवाईकांनी पोलीसांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. मात्र तो उच्चपदस्त पोलीस अधिकारी कोण याबाबत रात्री उशीरापर्यंत जिल्हाभरात चर्चा सुरू होती.
या अपघातात अतिगंभीर जखमी झालेले दत्तात्रय शिवराम शेवते हे एस.टी.महामंडळातील सेवा निवृत्त वरिष्ठ अधिकारी असून त्यांच्या अपघाताबद्दल भुईंज परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्यांचा अध्यात्मक व धार्मिकतेचा मित्र परिवार जिल्हाभरात आहे. जखमींचे नातेवाईक ग्रामस्थ यांची समजूत काढताना भुईंजचे सपोनि शाम बुवा पी.एस.आय दुर्गानाथ साळी यांनी योग्य ती कारवाई केली जाईल असे आवाहन करीत परिस्थिती हाताळली.
‘त्या इनोव्हा’च्या अपघातानंतर वातावरण तंग
RELATED ARTICLES