Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीचोरी करुन मालाची विल्हेवाट लावणार्‍या दोघांना अटक

चोरी करुन मालाची विल्हेवाट लावणार्‍या दोघांना अटक

जनरेटर, सेंट्रिंग प्लेट, डंपिंग जनरेटर असा 5 लाखाचा माल जप्त
सातारा : सैदापूर, ता. सातारा गोसावी वस्ती येथे चोरीच्या मालाची विल्हेवाट लावणार्‍या सैदापूर येथील सागर गोसावी (वय 22) व प्रवीण घाडगे (वय 19) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून जनरेटर, सेंट्रिंग प्लेट डंपिंग जनरेटर असा 5 लाख 40 हजार रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.
दि 20 एप्रिल रोजी लिंब खिंड नागेवाडी येथे प्रकाश कन्स्ट्रक्शनच्या गोडावून मधून जनरेटर ट्रॅक्टर ट्रॉली सेंट्रिंग प्लेटची चोरी झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सैदापूर परिसरात खास बातमीदाराच्या टीप वरून दोन पंचाच्या समवेत सापळा लावला. गोसावी वस्ती येथे पथकाने छापा मारला असता दोन संशयित बांधकामाच्या तीस सेंटरिंग प्लेटसह दिसून आले. त्या दोघांनी हा माल नागेवाडी येथील गोडाउन मधून चोरल्याची कबुली दिली. त्या दोघांना सातारा तालुका पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. सहाय्यक फौजदार मोहन घोरपडे, पृथ्वीराज घोरपडे, उत्तम दबडे, संतोष पवार, मुबीन मुलाणी, नितीन गोगावले, रविंद्र वाघमारे, रुपेश कारंडे, निलेश काटकर, विजय सावंत यांनी कारवाईत भाग घेतला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular