सातारा : संपूर्ण देशात आणीबाणीच्या काळात लोकांना आपलीशी वाटणारी बारणीशी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे ठिकाण. मात्र, सातारा तहसील कार्यालयातील बारणीशी ता. 22 मार्च अर्थात गेल्या चार दिवसांपासून बंद असल्याने सातार्यात ही अघोषित आणीबाणी कोणी लादली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सध्या लोकशाहीचा पवित्र उत्सव असताना सातारा तहसील कार्यालयात असा अनागोंदी कारभार सुरू असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
सातारा शहर परिसर आणि तालुक्यातून नागरिक सातारा तहसील कचेरीत येतात. मात्र, निवडणुकीची धामधूम असल्याने कचेरीतील बहुतांश कर्मचारी इलेक्शन ड्युटीला असल्याने नागरिक आल्या पावलाने माघारी फिरतात. हा प्रकार गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या 15-20 दिवसातील टपालच उघडलेली नसल्याने कित्येक कामे खोळंबली आहेत. अशात जावक विभागातील टपाल तशीच पडून असल्याचे पहायला मिळते. मतदान झाल्यावर हळूहळू सारे मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. पण मजे नाही ललाटी, ते देतो तलाठीफ या म्हणीप्रमाणे आज बारणीशी बंद असल्याने विचारणा केली असता कार्यालयाला सुट्टी असल्याचे सांगण्यात आले. 22 एप्रिल पासून बारणीशी बंद असली तरी वरिष्ठ अधिकार्यांना काही देणे-घेणे आहे का नाही, अशा चर्चा नागरिकांमध्ये रंगल्या होत्या.
विशेष म्हणजे तहसिलदारांसह नायब तहसीलदार कार्यालयाकडे न फिरकल्याने तहसिल कार्यालयातील सर्व विभाग ओसाड पडले होते. बारणीशी कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर मिळाले नसले तरी गेली दोन दिवस कार्यालय सुट्टी भोगणार्या दांडी बहाद्दरांवर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल अथवा निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा कारवाई करणार का, हा सवालच आहे.
सातारा तहसिल कार्यालय ओसाड
RELATED ARTICLES