Sunday, June 22, 2025
Homeताज्या घडामोडीप्राथमिक शिक्षण अधिकार्‍यांच्या ढिसाळ कारभारामुळे शिक्षक पगारापासून वंचित

प्राथमिक शिक्षण अधिकार्‍यांच्या ढिसाळ कारभारामुळे शिक्षक पगारापासून वंचित

सातारा : मार्च संपला, एप्रिल महिना संपत आला तरी सातारा जिल्ह्यातील शिक्षकांना अद्यापही पगार मिळाले नाहीत. प्राथमिक शिक्षण अधिकारी कोळेकरांच्या ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्यातील साडेआठ हजार शिक्षकांवर आज पगारापासून वंचित रहाण्याची वेळ आली आहे, असे संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बोलताना सांगितले. दरम्यान शिक्षण अधिकारी कोळेकर यांची भेट घेण्यासाठी आलेल्या शिक्षक संघटना पदाधिकार्‍यांची भेट न झाल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे आणि शिक्षण सभापती राजेश पवार यांनी तातडीने लक्ष घालून शिक्षकांच्या पगाराचा प्रश सोडवावा अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.
शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बोलताना सांगितले की, सातारा जिल्ह्यात सुमारे साडेआठ हजार शिक्षकांचे मार्च पासून पगार थकले आहेत. एप्रिल महिना संपत आला तरी पगाराकडे दुर्लक्ष करत आहेत. कोळेकर यांच्या हेकेखोर पणामुळे पगार लांबणीवर पडले आहेत.
कामावर लक्ष नसत अशा तक्रारी वाढल्या आहेत. तरी त्याच्या वर कारवाई होत नाही. सातारा जिल्हा परिषद महासंघाचे अध्यक्ष काका पाटील यानी कर्मचार्‍यांना त्रास देणे, फायली लपवून ठेवणे, जादा वेळ बसवून ठेवणे यावरून प्राथमिक शिक्षण अधिकारी कोळेकर यांना धारेवर धरून जाब विचारला होता. तरीही या शिक्षण अधिकारी यांच्या कारभारात सुधारणा होताना दिसत नाही. तसेच शिक्षण सभापती राजेश पवार हे सुध्दा शिक्षण अधिकारी यांना कामात सुधारणा करण्याच्या सूचना करत नाहीत, त्यामुळे शिक्षक वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान शिक्षक हा मुलांना शिकवण्याचे काम करत असतो. हे करत असताना शाळा बाह्य कामे शिक्षकांकडून करून घेतली जातात. पण त्याचा योग्य प्रकारे मोबदला दिला जात नाही. निवडणूकिला जवळपास सर्व शिक्षक कामाला लावले होते. पण निवडणुकातील कामांचे भत्ते देताना दुजाभाव केला जात आहे. निवडणूक भत्ता कमी का? दिला जातो. अशी विचारणा शिक्षकांनी केली तर आचारसंहितेची भीती दाखवली जाते. आयोगाच्या कारवाईमुळे नसत झेंगट माग नको म्हणून काहीच बोलत नाहीत. सर्व कर्मचार्‍यांसह, शिक्षकांना तोड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे अशी स्थिती होऊन बसली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular