Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीदीड हजाराची लाच घेताना हवालदार गुलाब भोसलेस अटक

दीड हजाराची लाच घेताना हवालदार गुलाब भोसलेस अटक

सातारा : वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात दाखल असलेला अदखलपात्र गुन्ह्याचा तपास करुन देण्यासाठी पोलीस हवालदार गुलाबराव भोसले यांनी तक्रारदार यांच्याकडून दीड हजाराची लाच स्विकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा कार्यालयाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दरम्यान, पोलिस हवालदार भोसले यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यास अटक झाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार व त्यांचे शेजारी यांच्यामध्ये वाद झाला होता. याबाबत परस्पर विरोधी वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. अदखलपात्र गुन्ह्याचा तपास करुन तक्रारदार यांना न्याय देण्यासाठी पोलीस हवालदार गुलाबराव भोसले यांनी 2 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत ठरलेला सौद्याप्रमाणे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांच्याकडे तक्रार नोंदविली होती. या तक्रारीप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक संदीप दिवाण, पुणे कार्यालयाचे पोलीस अधिक्षक श्रीमती सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा कार्यालयाचे पोलीस निरीक्षक आरिफ मुल्ला, सहाय्यक पोलीस फौजदार जयंत कुलकर्णी, आनंदराव सपकाळ, पो. हवा. भरत शिंदे, संगम साळुंखे, पो. ना. संजय अडसूळ, अजित कर्णे, विनोद राजे, प्रशांत ताटे, मपोना श्रध्दा माने, पो. कॉ. विशाल खरात, संभाजी काटकर, तुषार भोसले, निलेश येवले, निलेश वायदंडे, मपोकॉ शितल सपकाळ, चालक पो. हवा. शंभू संपकाळ यांच्या पथकाने आज पोलीस हवालदार मोहन गुलाबराव भोसले यास 1500 रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. दरम्यान, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उपअधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सि. स. नं. 54/अ जिल्हा पुनर्वसन कार्यालयाजवळ सदरबझार सातारा येथे अथवा फोन नं. (02162) 238139 किंवा व्हॉटस्अप नंबर 7875333333, मो. नं. 8975651262 संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular