सातारा : मोती चौकातील स्वा. सावरकर मार्गावर एबीपी माझा’कडून स्वा. सावरकर जयंतीच्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर नायक की खलनायक असा कार्यक्रम घेऊन स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांची बदनामी केली म्हणून उपस्थित देशभक्त नागरिकांकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष सापते महाराज यांनी स्वा. सावरकर प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी ते म्हणाले की, स्वा. सावरकरांसारखे व्यक्तीमत्व होणे नाही त्यांनी ज्या हालअपेष्टा सोसल्या त्याला तोड नाही अशा देशभक्तांवर चिखलफेक करुन खलनायक ठरविण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही तिव्र शब्दात निषेध करतो.
हिंदू महासभा प्रदेश उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद गांधी म्हणाले की, स्वा. सावरकर नायक व खलनायक नाही तर ते या देशाचे महानायक आहेत अशा यास महानायकाची बदनामी करण्याचा प्रयत्न एबीपी माझा’ने केला त्याचा हिंदू महासभेच्या वतीने निषेध करतो.
पत्रकार राहूल कोल्हापुरे म्हणाले की, स्वा सावरकरांची अशाप्रकारे कोणीच निंदा नालस्ती केली नाही मात्र एबीपी माझा जोपर्यत माफी मागत नाही तोपर्यत या वृत्त वाहिनीवर जनतेने बहिष्कार टाकावा. श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज घाडगे यांनी स्वा. सावरकरांच्या कार्याचे महत्त्व सांगून एबीपी माझाचा निषेध केला.
हिंदूमहासभा जिल्हाध्यक्ष अधिवक्ता दत्ता सणस म्हणाले की, एबीपी माझाने केवळ स्वा. सावरकरांचाच अपमान केला नाही तर सर्व देशभक्तांचा अपमान केला आहे. लाखवेळा माफी मागीतली तरी माफ करता येणार नाही. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष बाबुजी नाटेकर, अधिवक्ता सतिश खानविलकर, जैन संघटनेचे भंवरलाल जैन, मुकुंद पंडित, दिनेश महाराज दवे, उमेश गांधी, इ. मान्यवर उपस्थित होते.
देशभक्त नागरिकांकडून एबीपी माझा’चा निषेध
RELATED ARTICLES