Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीमंगळवार तळ्याची लोकसहभागातुन स्वच्छता करण्याच्या कामाचा शुभारंभ

मंगळवार तळ्याची लोकसहभागातुन स्वच्छता करण्याच्या कामाचा शुभारंभ

सातारा : सातारच्या ऐतिहासिक मंगळवारतळे जरी आमच्या खाजगी मालकीचे असले तरी सार्वजनिक वापरातच जास्त उपयोगात आलेले आहे. त्यामुळे या तळयाची येथील स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेवून लोकसहभागामधुन स्वच्छता करण्याचा घेतलेला निर्णय निश्‍चितच स्वागतार्ह आणि प्रेरणादायी आहे. या स्वच्छता उपक्रमास व्यक्तीशः आमच्या वतीने लागेल तर सहकार्य सदैव राहीले असे उद्गार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी काढले.
पर्यावरण दिनानिमित्त सातारच्या ऐतिहासिक मंगळवार तळे परिसरातील रहिवासी, नगरसेविका सौ.सुनीता महेश पवार व महेश पवार, राजनशेठ चतुर, माजी नगरसेविका हेमांगी जोशी आदींच्या पुढाकाराने, मंगळवार तळयाची लोकसहभागातुन स्वच्छता करण्याच्या कामाचा शुभारंभ खा. उदयनराजे भोसले यंाच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी नगरसेविका हेमांगी जोशी यांनी सांगीतले की, सध्याच्या काळात पाण्याच्या अस्तित्वातील स्त्रोतांचे जतन करणे ते वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे. पर्यावरण र्‍हासामुळे अनेक दुष्परिणाम समोर येवू लागले आहेत, पाण्याचे दुर्भिक्ष्य कधी नव्हे ते इतके जाणवत आहे. त्यामुळे मंगळवार तळयाच्या परिसरातील नागरिकांनी एकत्र येवून, केवळ सामाजिक जबाबदारी म्हणून ऐतिहासिक मंगळवार तळयाची लोकसहभागामधुन स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आठवडयातुन दोन वेळा कमीत कमी तीन तास स्वच्छता करण्यात येणार आहे. या उपक्रमात लोकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होणार. स्थानिक व्यक्तींनी एक मिशन म्हणून हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमात सहभागी होणारा कोणीही लहान मोठा असा भेदभाव नसून, सामुहिक नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविणेत येणार आहे. चांगल्या कामाला लोकांचा लोकसहभाग निश्‍चित मिळेल असा विश्‍वास आहे असे नमुद केले.
यावेळी नगरपरिषदेचे पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, महेश पवार, नगरसेविका सौ.सुनिता पवार, राजनशेठ चतुर, जेष्ठ पत्रकार शरद काटकर, नितिन नारकर, सुनिता सातपुते,महाडीक,राजेश माने,अक्षय जोशी,मुकूल डांगे,दिलीप जाधव, यांचेसह जेष्ठ नागरिक, स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular