रायगड : किल्ले रायगडावर खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी 346 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहून छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी शिवस्मारक, ईव्हीएम घोटाळा, यारख्या अनेक मुद्द्यांवर उदयनराजे भोसले यांचा आक्रमक अवतार पाहायला मिळाला.
जनतेने आता लक्षात घेतलश्र तर ठीक आहे नाहीतर काही खर नाही. या लोकांना तुम्हाला फक्त भीती घालून द्यायची आहे. सरकार म्हणतंं माझ्या ताब्यात आरबीआय, सीबीआय, निवडणूक आयोग आहे. अस म्हणत उदयनराजेंनी सरकारवर चांगलेचे ताशेरे ओढले आहेत.
दरम्यान, या सगळ्या संस्थेतील लोकांनी लक्षात घेतल पाहिजे आपण लोकांच्या हिताचे करत आहोत की नाही. नाहीतर 1857 मध्ये जसा बंड झाला तसा उद्रेक व्हायला फार काळ लागणार नाही आणि तो जर झाला तर त्याला कोणीही थांबवू शकणार नाही . असा थेट हल्लाच उदयनराजेंनी रायगडावरून सरकारवर चढवला आहे.
खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांची शिवराज्याभिषेक सोहळ्यास उपस्थिती
RELATED ARTICLES