Friday, June 20, 2025
HomeUncategorizedशिवनेरी सहकारी बँकेचे नामांतर आता पुणे कमर्शिअल को- ऑपरेटीव्ह बँक रविवारी उदघोषणा...

शिवनेरी सहकारी बँकेचे नामांतर आता पुणे कमर्शिअल को- ऑपरेटीव्ह बँक रविवारी उदघोषणा समारंभ

सातारा : कोरेगावची शिवनेरी सहकारी बँकेचे नामांतर आता पुणे कमर्शिअल को- ऑपरेटीव्ह बँक असे होत आहे. या बदलाचा उद्घोषणा समारंभ येत्या रविवारी, दि. 23 रोजी सातार्‍यात होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली आहे. यानिमित्ताने बँकेची वेबसाईट, डीजीटल बँकींग सेवा व सुविधांचा प्रारंभही होणार आहे.
सातार्‍यात पुष्कर मंगल कार्यालयात रविवारी, सायंकाळी पाच वाजता भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांच्या हस्ते होणार्‍या या कार्यक्रमास राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, राज्याचे सहकार आयुक्त सतीश सोनी, महाराष्ट्र बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक राधेश्याम चांडक यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे.
बँकेचे संस्थापक तानाजीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग 23 वर्षे सातारा, सांगली, पुणे व सोलापूर जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या पूर्वाश्रमीच्या शिवनेरी सहकारी बँकेची स्थापना 1996 मध्ये झाली आहे. या बँकेचा सातारा, कोरेगाव, वाई व लोणंद असा चार शाखांचा कार्यविस्तार आहे. चार हजार सभासद, 27 कोटींच्या ठेवी, 162.09 लाखांचे भागभांडवल अशी बँकेची सांपत्तिक स्थिती आहे. नेट एनपीएचे प्रमाण 2.12 टक्के असून सीडी रेशो 70.84 टक्के आहे. बँकेकडे ठेवी व कर्जसुविधा या दोन्हीच्याही आकर्षक योजना आहेत. याशिवाय महिला बचत गटांना कर्जपुरवठा आणि त्यांच्याव्यवसायवृध्दीसाठी बँकेने विशेष योजना कार्यान्वित केली आहे. याशिवाय लॉकर्स, झिरो बॅलन्स सेव्हिग्ज अकाउंट, पॅन कार्ड, युटीलीटी बँक पेमेंट आदींच्या माध्यमातूनही बँक ग्राहकसेवेचा वसा जपत आहे. पूर्वीचीच आपुलकी कायम ठेवून व्यवसायविस्ताराची नवी भरारी घेण्यासाठी बँक सिध्द झाल्याचे सांगून शिरीष देशपांडे व सहकर्‍यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन केले आहे.
या पत्रकार परिषदेवेळी बँकेचे संस्थापक तानाजीराव शिंदे, उपाध्यक्ष विजय चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय पाटील, अनिल शिंदे, अभिजित सूर्यवेशीं, प्रसाद पवार, भीमराव जाधव, सचिन साळुंखे आदींची उपस्थिती होती.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular