आ.जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती
सातारा : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागातील लोकांना पाणी मिळावे यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नंतर आ. जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून यशस्वीपणे तोडगा काढला आहे. त्यामुळे आता दुष्काळी भागात साखर कारखाने उभे राहिले आहेत.याचा आनंद वाटत आहे अशी माहिती आ.जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात दुष्काळी भागातील जिहे-कठापुर योजना व ठेंभु योजना पूर्ण करावी.मायणी व कूकुडवाड सह 32 गावातील पाणी प्रश्न सुटला पाहिजे याच भूमिकेतून भाजप-सेनेचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारली होती.ती पार पाडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकरी व जनतेला आता 55 वर्षाने हक्काचे पाणी मिळत आहे. ठेंभु योजनेतील 80 हजार 884 हेक्टर जमीन ओलिताखाली येत आहे. आता दुष्काळी भागातील मायणी व कुकुडवाड परिसरातील तसेच माण तालुक्यातील 154 गावांना पाणी मिळणार आहे. असे स्पष्ट करून आ. गोरे यांनी सांगितले की, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकार असताना माजी मंत्री अजित पवारांनी या योजनेला सुधारित प्रशासकीय मंजुरी मिळू नये याची काळजी घेतली होती. त्यामुळे282 कोटी रुपये खर्च केले नाहीत. रामराजे नाईक निंबाळकर यांची लायकी नाही. त्यांनी इमान विकले. मंत्री असताना फक्त धोम-बलकवडी धरणातून फलटणला अडीच टी. एम. सी. पाणी देऊन भगीरथ बनले आहेत. बारामतीला या कालावधीत बारा टी. एम. सी. पाणी दिल्याचा ही आरोप करण्यात आला.
भविष्यात माण-खटाव तालुक्यातील प्रत्येक गावात दोन वर्षात पाणी मिळाले नाही तर आमदार म्हणून काम करणार नाही याचा आ. गोरे यांनी पुनरुच्चार केला. निरा-देवधरचे पाणी लाभक्षेत्रात मिळणार आहे. प्रत्येकाला उत्तर कसे देणार आहे. हे विरोधकांना ही माहिती आहे. या योजनेचे श्रेय अनिल देसाई घेतात या प्रश्नाला उत्तर देताना आ. गोरे म्हणाले, भुरट्या लोकांचे काही विचारू नका. आ. गोरे यांनी यावेळी आ. शशिकांत शिंदे यांनी प्रयत्न केले पण, त्यांच्या नेत्यांनी ऐकलं नाही असे ही सांगितले.विधीमंडळ सभागृहात मी रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे बघतो पण, ते बघत नाहीत असे ही मुश्किल पणे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला सांगितले. आ. गोरे हे योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. असे ही सांगितले
माण-खटावच्या ऐतिहासिक पाणी प्रश्नाला मिळाला तोडगा
RELATED ARTICLES

