सातारा : बंद करा, बंद करा मॉबलिंचींग बंद करा, आझादी आझादी, धर्मवादसे आझादी तबरेज तेरे खुनसे, इन्कलाब आएगा राम हमारा, रहिम हमारा, नफरत का ए खेल तुम्हारा अशा घोषणा देत सातारा येथे आज दुपारी शांतताप्रेमी व मानवतावादी नागरिकांच्यावतीने भर पावसात महामोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला.
देशभरात धार्मिक कट्टरवाद्यांकडुन मॉबलिंचींगच्या घटना वाढल्या आहेत. दलित, आदिवासी, व अल्पसंख्यांकाविषयी, सातत्याने विद्वेष आणि घृणेचे वातावरण निर्माण केले जात आहे. लोकशाही व कायदा- सुव्यवस्था व न्याय या सारयांवरचा विश्वास उडावा इतकी परिस्थिती गंभीर आहे. या गोष्टीच्या निषेधार्थ सातारा शहरातील सर्व मानवतावादी व शांतताप्रेमी नागरिकांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा महात्मा गांधी मैदानावरुन राजपथमार्गे पोवई नाक्यापर्यंत काढण्यात आला.
भरपावसात घोषणा देत मोर्चा शिस्तबद्ध पध्दतीने काढण्यात आला. मोर्चाचा समारोप पोवई नाक्यावर करण्यात आला. तेथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मोर्चापुढे मौलाना जमिर, सातारा जिल्हा महिला संघटनेच्या ऍड वर्षा देशपांडे, विद्रोही सांस्कृतीक चळवळीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष विजय मांडके यांची भाषणे झाली.
मोर्चाचे आयोजन जमियत उलेमा ए हिंद, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, सातारा जिल्हा महिला संघटना, मुक्तीवादी संघटना , मुस्लिम जागृती अभियान, मुस्लिम ओ.बी.सी. संघटना, संबोधी प्रतिष्ठान, सिटू, सलोखा, राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, अखिल भारतीय छावा संघटना, सत्यशोध, सातारा शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था, भारत मुक्ती मोर्चा, समाजवादी प्रबोधिनी, श्रमिक मुक्ती दल, आदी संघटनांनी केले होते.
मोर्चा नंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना पंतप्रधान यांना द्यावयाचे निवेदन दिले. मोर्चामध्ये शाही मस्जिदचे इमाम हाफिज खलिल अहमद काघजी, मुफ्तीसाब अब्दुल हमीद, मौलाना जमीर, हाजी जलाल्लुद्दीन, आघाडीचे उद्योजक बाबाशेठ तांबोळी, अॅड. शैला जाधव, मिनाज सय्यद, अहंमद कागदी, नगरसेवक शकिल बागवान, हाजी सादिकभाई शेख, सादिक खान, अमजदभाई शेख, भारत मुक्ती मोर्चाचे मौलाना कमरुद्दीन, मुजफ्फर सय्यद, तौसिफ शेख, आरिफ शेख, मिलिंद पवार, मुसरत शेख, मोहसीन कोरबू, अहमद कागदी, रफिक शेख, सोहेल सय्यद, जुनैद शेख, गुफरान शेख, कॉ वसंत नलावडे, दिनकर झिम्बरे, रखमा हेमा श्रीकांत यांच्या सह अनेकजण सहभागी झाले होते.
मॉबलिंचींग विरोधात सातार्यात शांतताप्रेमी नागरिकांचा मोर्चा
RELATED ARTICLES