Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीप्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी शिक्षक संघाचे 3 आँगस्ट रोजी धरणे आंदोलन

प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी शिक्षक संघाचे 3 आँगस्ट रोजी धरणे आंदोलन

सातारा : जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधून घेवून ते सोडवून घेण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शनिवार दि.3ऑगष्ट रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष सिध्देश्वर पुस्तके यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक भवन सातारा येथे झालेल्या महामंडळ सभेत घेण्यात आला.
यावेळी प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र घोरपडे, व्हा.चेअरमन महेंद्र अवघडे व बँकेचे संचालक , कराड पाटण शिक्षक सोसायटीचे चेअरमन नामदेव घोलप,जिल्ह संघाचे पदाधिकारी रामचंद लावंड मोहनराव जाधव,सुरेश गायकवाड, महेंद्र जानुगडे, राजेंद्र बोराटे,समीर बागवान,सुनिल सावंत, तानाजी ढमाळ,अनिल जायकर,दादासाहेब सरकाळे, गोरख साळुंखे,संतोष जगताप,प्रविण घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सिध्देश्वर पुस्तके म्हणाले जिल्हयातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी जिल्हयातील शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक,पदवीधरउपशिक्षकांची रिक्तपदे पदोन्नतीने त्वरीत भरावीत या व अन्य मागण्याकडे जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने देवून,चर्चा करुनही दुर्लक्ष होत असून शिक्षकांच्या बदल्यात गैरसोई झालेल्या शिक्षकांना विशेषता महिला शिक्षिकांना सोईच्या शाळा देण्यात याव्यात तसेच मागील वर्षीचे रॅण्डम राऊंड व या शैक्षणिक वर्षातील विस्थापित शिक्षक बंधू भगिनी यांना सम उपदेशाने बदलीची संधी मिळावी नगरपालिका प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा अंशदायी पेन्शन योजनेच्या हिशोबाच्या स्लिपा संबंधितांना मिळाव्यात या व अन्य प्रलंबित मागण्यां साठी जिल्हा प्रशासनाकडे संघटनेकडून अनेक वेळा निवेदन देऊन चर्चा करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे म्हणून आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी हजारोंच्या संख्येने धरणे आंदोलनास उपस्थित राहावे असे आवाहन केले.
यावेळी ज्या शिक्षकांना बारा वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांचे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव त्वरित मंजूर करण्यात यावेत प्रलंबित मेडिकल बिले व भ.नि.नि प्रकरणे त्वरित मंजुरी करावीत, पर जिल्हयात बदली झालेल्या शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रखमा संबंधित जिल्हा परिषदेमध्ये तातडीने वर्ग करण्यात याव्यात प्रलंबित वरिष्ठ वेतनश्रेणी फरक बिले मंजूर करावीत कमी पटाच्या शाळा समाजाच्या नावाखाली बंद करण्यात येऊ नयेत निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर व्हावेत प्रलंबित शाळा बांधकाम पाच टक्के रक्कम दिली मिळावेत प्रकरणांना मंजुरी मिळावी सन 2006 ते 2009 सेवानिवृत्त झालेल्या सेवा निवृत्त शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागू नसून सन 2016 ते 19 2019 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू झाला नाही तरी संबंधितांना सातवा वेतन आयोग लागू करून फरकाच्या रकमा त्वरित मिळाव्यात आदी प्रश्नांबाबत चर्चा झाली.
यावेळी शिक्षक बँकेचे संचालक भगवान धायगुडे अनिल शिंदे मोहन निकम ,ज्ञानेश्वर कांबळे गणेश तोडकर दत्तात्रय कोरडे राजकुमार जाधव शंकर जांभळे चंद्रकांत आखाडे ,बंडोबा शिंदे राजाराम खाडे सौ वैशाली जगताप सौ निर्मला बसागरे, कराड पाटण सोसायटीचे माजी चेअरमन संजय शेजवळ, बाजीराव शेटे सर्व तालुका संघाचे अध्यक्ष महेंद्र इथापे, शाम पवार संतोष कदम, लालासो भंडलकर सूर्यकांत कदम ,तात्यासो सावंत मोहन पाटील, सुरेश जेधे, हिम्मत जगताप, गणेश शिंदे ,राजू घोरपडे , सतीश जाधव सुरज तुपे तानाजी साळूंखे ,रवींद्र भोसले ,मधुकर गावडे , पोपट चांगण, लालासो भोसले ,सचिन जाधव, किरण खरात, सुरेश दुधाने विजय शिर्के ,दादा थोरात प्रवीण गायकवाड, धनाजी चव्हाण, संभाजी जाधव गणपत घाडगे रामचंद्र चव्हाण रियाज पटेल शांताराम मासाळ,राजेंद्र दगडे, सुनील धनावडे, नारायण धायगुडे मिलिंद जगताप, सुभाष जाधव , गणेश धुमाळ यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular