Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडी8 दरोडेखोरांची टोळी गजाआड, 3 दरोडे तब्बल 85 घरफोड्या उघडकीस

8 दरोडेखोरांची टोळी गजाआड, 3 दरोडे तब्बल 85 घरफोड्या उघडकीस

13 लाख 85 हजारांचा ऐवज हस्तगत.
सातारा : सातारा जिल्ह्यातील सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच सांगली जिल्ह्यातील विटा पोलीस ठाणेच्या हद्दीतील झालेल्या 85 घरफोड्यांचा छडा लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेला घवघवीत यश आले आहे. या धाडसी कारवाईत अटक केलेल्या दोन आरोपी कडून 6 लाख 80 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे 200 ग्रॅमचे दागिने 40 हजार रूपये किंमतीचे 1 किलो चांदीचे दागिणे, मोबाईल हॅण्डसेट, घडयाळे, वाहने, 8 जणांच्या या टोळीने केलेल 3 दरोडे आणि घरफोडीच्या 34 गुन्ह्यांतील असा सुमारे 13 लाख 85 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात यश आले आहे. येवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी एवढे गुन्हे उघडकीस येण्याची कोल्हापूर परिक्षेत्रातील अलिकडच्या काळातील पोलीसांचे हे मोठे यश असून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचलाक सुहास वारके आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले असून विशेष बक्षीस जाहिर केले आहे.
2019 मध्ये सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यामध्ये सिद्धेश्‍वर कुरोली, मांडवे, पुसेसावळी या ठिकाणी 3 धाडसी दरोडे, दरोडेखोरांनी टाकले होते. सदर दरोड्यांच्या गुन्ह्याचा समांतर तपास करून, गुन्हे उघड करून चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी पोनि विजय कुंभार यांना सुचना दिल्या होत्या. कुंभार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सपोनि प्रसन्न जर्हाड व त्यांच्या पथकाला सुचना केल्याने या गुन्ह्यात जावेद अनिल काळे रा. फडतारवाडी, करण वरीसर्या काळे, रा. भांडेवाडी ता. खटाव., निकाल लत्या काळे रा. कोकराळे ता. खटाव, संकेत आलिशा काळे, रा. सिद्धेश्‍वर कुरोली, ता खटाव, अभिजीत मंज्या शिंदे, रा. सिद्धेश्‍वर कुरोली ता. खटाव, ऋतुराज भावज्या शिंदे रा. कटकरवाडी ता. खटाव यांना सशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आले.त्यांच्याकडे अधीक चौकशी केली असता त्यांनी खटाव,माण,कोरेगाव तसेच सांगली जिल्ह्यातील विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे 85 गुन्हे केल्याची कबुली दिली.
पोलीस अभिलेखावर असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांची माहिती घेतली असता वडूज, पुसेगाव,औंध, कोरेगाव,रहिमतपूर, म्हसवड, दहिवडी, तसेच सांगली जिल्ह्यातील विटा येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा आणि घरफोडी झाल्याची खातरजमा झाल्यावर आणखी या टोळीमध्ये कोणाचा समावेश आहे का या संदर्भात चौकशी केल्यानंतर आरोपीने अज्या उर्फ अजय शेर्‍या उर्फ शरद भोसले (वय 22 रा. नेर ता. खटाव), जावेद अनिल काळे (वय 20 रा फडतरवाडी खटाव) या दोघांची नावे स्पष्ट झाल्याने या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर आरोपीनीं धक्कादायक माहिती दिल्याने पोलीस यंत्रणा चक्रावून गेली.
या टोळीकडून स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाने कसून चौकशी करून औध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 9, वडूज 28, पुसेगाव 16, कोरेगाव 6, रहिमतपूर 10, म्हसवड 14, दहिवडी 1, विटा 1, असे एकुण 85 गुन्ह्यात 6 लाख 80 हजार रूपये किंमतीचे 20 तोळ्याचे दागिने, 40 हजार रूपये किंमतीचे 1 किलो वजनाचे चांदीचे दागिने, किमती मोबाईल हॅण्डसेट, घड्याळे, चोरीची वाहने हस्तगत करण्यात यश आले. या टोळीकडून 3 दरोड्याचे गुन्हे उघडकीस आले असून पोलीसांनी घरफोडीच्या 34 गुन्ह्यात एकुण 13 लाख 85 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि विजय कुंभार सपोनि प्रसन्न जर्हाड,पोलीस कर्मचारी सुधीर बनकर, संतोष पवार, तानाजी माने, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, अर्जुन शिरतोडे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, विक्रम पिसाळ विशाल पवार, संजय जाधव, अजय सावंत तसेच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोकराव पाटील, हवलदार ओंबासे, देवकुळे अर्जुन खाडे यांनी सहभाग घेतला आहे.

विशेष चौकट- स्थागुशाचे तत्कालिन पोनि पद्माकर घनवट यांनी अश्याच प्रकारे गुन्हे उघडकीस आणण्याचा धडाका लावला होता त्यांची बदली झाल्यानंतर विजय कुंभार यांनी कार्यभार स्विकारला. त्यानंतर 2 ते 3 महिन्यात कुंभार यांना गुन्हे उघडकरण्यास तितकेसे यश आले नाही. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि कुंभार हे जिल्ह्यासाठी नवीनच असल्याने त्यांच्यापूढे गुन्हेगारांचे आव्हान होते. या दोघांनीही जिल्ह्याच्या गुन्हेगारी पार्श्‍वभुमीचा अभ्यास करून गेल्या 2 ते 3 महिन्यात गुन्हे उघडकीस आणून या पूर्वीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे रेकॉर्ड तोडले आहे. गतवर्षी हद्दपारीचे 10 प्रस्ताव सादर झाले त्यामधील 5 रद्द झाले. मात्र कुंभार यांनी आज अखेर 7 प्रस्ताव दाखल केले आहेत. 8 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळुन 3 दरोडे आणि 85 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणल्याने स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे जनतेतुन कौतुक केले जाते.

छायाचित्र – पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सह स्थागुशाचे पोनि विजय कुंभार व टीम

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular