दरूज येथील संशयीत फरार
वडूज : येथील एका पारधी समाजातील एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दरूज, ता.खटाव येथील एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, सदरची पिडीत महिला वडूज येथील स्मशानभूमी परिसरातील खारवळ रस्त्यावर वास्तव्यास असते. रविवार दि. 28 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सदरची महिला पालात एकटीच असताना दरूज येथील नामदेव चव्हाण नावाच्या संशयीताने तिच्यावर जबरी बलात्कार केला. तसेच आरडा ओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. काही वेळाने संशयीत चव्हाण हा पळून गेल्यानंतर पिडीत महिलेने याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात घडलेल्या अत्याचाराबाबत तक्रार दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे अधिक तपास करीत आहेत.चव्हाण हा फरारी असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
चौकट : पोलीसांची अनास्था
घडलेल्या घटनेबाबत सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास पत्रकारांनी पोलीस ठाण्यात फोन केला असता त्यावेळी जबाबदार अधिकारी, कर्मचारी कोणच नसल्याने एका पोलीस मित्राने फोन घेतला. व नंतर करा माहिती मिळेल असे सांगितले. त्यानंतर रात्री आठ वाजता पुन्हा पोलीस ठाण्यात फोन केला असता ठाणे अंमलदार जेवण करण्यास गेले आहेत, आपण माहिती देऊ शकत नाही असे दूरक्षेत्र सेवेत कार्यरत असणार्या नरळे नामक पोलीस हवालदाराने सांगून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. या तसेच इतर गुन्ह्यांच्या बाबतीत माहिती देण्यास नेहमीच पोलीसांकडून अनास्था दाखविली जाते. यासंदर्भात जिल्हा पोलीस प्रमुखांना प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी भेटून निवेदन देण्याच्या पावित्र्यात आहेत.
वडूजमध्ये पारधी महिलेवर बलात्कार
RELATED ARTICLES