Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीवाईत भंडारी इंटरप्रायजेसला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान

वाईत भंडारी इंटरप्रायजेसला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान

शॉटसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
वाई : रविवारी पहाटे साडेपाच वाजता गंगापुरीतील भंडारी इंटरप्रायजेसला भीषण आग लागल्याने त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून यामध्ये हळदीची पावडर करण्याची मशीन, शेंगाचे तेल काढण्याची मशीन व माल असा ऐकून आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
आजपर्यंत वाई शहरात अनेक वस्तुंना आगी लागल्या आहेत. त्या सर्व शॉटसर्किटमुळेच लागल्या आहेत त्यामुळे शॉटसर्किटमुळे आग लागण्याचा गौडबंगाल काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.वाई शहरात आग लागण्याचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी त्याचा मुळाशी जावून तपास करावा अशी मागणी जोर धरत आहे, शॉटसर्किटमुळे आग लागल्याची फिर्याद भंडारी इंटरप्रायजेसचेमालक सुयोग भंडारी यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे.
वाई पोलीस ठाणे व घटना स्थळाहून मिळालेली माहिती अशी कि, गंगापुरी वाई येथील भंडारी इंटरप्रायजेसला पहाटे साडे पाचच्या सुमारास आग लागली. धुराचे लोट इंटरप्रायजेसमधून बाहेर निघाल्याचे शेजारच्या नागरिकांनी भंडारी यांना कळविले, वाई, पाचगणी, किसनवीर कारखाना या ठिकाणच्या अग्नीशमन बंबांना पाचारण करेपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.स्थानिक नागरिकांच्या व अग्निशमन बंबाच्या सहाय्याने तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग विझविण्यात यश मिळाले, गंगापुरीच्या मुख्य चौकातच ही भीषण आग लागल्याने शेजारी असणार्या इमारतींना धोका निर्माण झाला होता.परंतु तीन बंबाच्या सहाय्याने पाण्याचा मारा केल्याने आग विझविण्यात यश आले.
भंडारी इंटरप्रायजेसमध्ये हळदीची पावडर तयार केली जाते. धान्यावर प्रक्रिया, शेंगतेल काढण्याची ही मशनरी बसविण्यात आली आहे. तसेच विविध प्रकारचा माल सुध्दा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिल्लक होता. सर्व प्रकारच्या मशनरी व कच्चा माल आगीत जाळून खाक झाल्याने भंडारी यांचे आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी कामगार महिलेचे केस आडकून मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली होती. त्यामुळे भंडारी कुटुंबीयांवर मोठा आघात या घटनेमुळे झाला आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular