वाई : धोम, ता. वाई येथील दिनकर लक्ष्मण गायकवाड यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची फिर्याद पुतण्या शिवाजी शंकर गायकवाड वय 52 यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे.
वाई पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, दिनकर गायकवाड व त्यांची पत्नी आजारी असल्याने 11 जुलै पासून सातारा येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेऊन सातारा येथील मुलगी च्या घरी राहत होते. 20 जुलै रोजी मुंबई येथे नोकरीस असलेला मुलगा सिंहजीराव घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान रविवार दि 28 रोजी सकाळी 11 वाजता फिर्यादी शिवाजी गायकवाड यांना घराला बाहेरून कडी लावल्याचे दिसले शेजारील चुलत भाऊ महादेव गायकवाड यांच्या सह घरात जावून खात्री केली असता चोरी झाल्याचे दिसले मुलगा सिंहजीराव याला फोन वरून माहिती दिली त्यांनी गावी येवून पाहिले असता रोख रक्कम40 हजार व दागिने या मध्ये मंगळसूत्र, मण्यांची माळ, कानातील फुले, अंगट्या व नथ असे दागीने मिळून 1 लाख आठ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्रसिंह निंबाळकर करीत आहेत.
बंद घर फोडून रोकडसह लाखाचा ऐवज लंपास
RELATED ARTICLES

