औंध:-औंध-नांदोशी रस्त्यालगत कोणी अज्ञात व्यक्तीने लिंबाची माळ घातलेले, काळ्या कपड्यात बांधलेले गाठोडे ठेवले होते.बुधवार सायंकाळ पासून नांदोशी येथील गतिरोधकाच्या अलीकडे काही अंतरावर पडलेल्या या काळ्या गाठोड्याकडे प्रवासी व परिसरातील शेतकरी बगल देऊन जात होते, शुक्रवारी दुपारी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्या गाठोड्यातील सर्व वस्तू बाहेर काढून नांदोशी ग्रामस्थांच्या समोर त्याची होळी केली.
याबाबत माहिती अशी की, औंध-नांदोशी रस्त्यावर बुधवार सायंकाळ पासून एक मोठे गाठोडे पडल्याचे येणार-जाणाऱ्या प्रवासी व स्थानिकांच्या निदर्शनास येत होते.काहींनी गाठोडे हलविल्याचे प्राथमिक निदर्शनास आले,मात्र त्याच्या आत असणारी लिंबे,काळ्या भावल्या,दोरे,कोहळा दिसल्यावर तेथून पळ काढला असावा.त्यानंतर त्याला वाहनधारक व स्थानिक बगल देऊन जात होते,शुक्रवारी औंध येथील अंनिसच्या कार्यकर्त्यांना या गाठोड्याविषयी माहिती मिळाल्यानंतर प्रशांत जाधव, शुभम इनामदार,श्रीपाद सुतार हे कार्यकर्ते घटनास्थळी आल्यावर त्यांनी ते गाठोडे सोडून काळ्या बाहुल्या,हळद-कुंकू लावलेले लिंबू, दोरे व कोहळा व अन्य वस्तू त्यांनी जाळून टाकल्या.काळे गाठोडे जाळल्याने आसपासच्या शेतकऱ्यांनी मनोमनी आनंद व्यक्त केला.अंनिसच्या कार्यकर्यांना धन्यवाद दिले.
अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केली लिंबू-कोहळ्याची होळी ; काळ्या गाठोड्यास तीन दिवसांपासून बगल देऊन जात होते प्रवासी.
RELATED ARTICLES