सातारा : आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सातारा माहिती केंद्रातर्फे येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर १४ मार्च रोजी सायं ६ वा. परमपूज्य श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत महासत्संगाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्राचे समन्वयक सुधीर घार्गे ,संजय खटावकर ,अभय चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली . यावेळी दुपारी ३ते५ या वेळेत युवाचार्य संमेलन होणार असून या संमेलनाला सातारा जिल्ह्यातील पाच हजार साधक उपस्थित राहणार आहेत . श्री सुधीर घार्गे पुढे म्हणाले ,आर्ट ऑफ लिव्हिंगचे सामाजिक शैक्षणिक अध्यात्मिक विकास साधण्याचे कार्य १५५ देशांमध्ये सुरू आहे . महासत्संगामध्ये रविशंकर यांच्या समवेत भजन ज्ञानामृत ध्यान असा अनोखा अनुभव मिळण्याची संधी मिळणार आहे . युवाचार्य संमेलनाला ५००० प्रशिक्षकाना स्वतः श्री श्री रविशंकर मार्गदर्शन करणार आहेत . यावेळी शिवदास कदम ,श्रध्दा लांडे ,संदीप सुतार ,प्रिया जगदाळे, सुनीता पवार ,वर्षा खटावकर ,भारती जगताप ,यतीन जोशी उपस्थित होते .
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सातारा माहिती केंद्रातर्फे सैनिक स्कूलच्या मैदानावर १४ मार्च रोजी परमपूज्य श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत महासत्संगाचे आयोजन
RELATED ARTICLES