
सातारा, 14 मार्च : सातारा हा शौर्य आणि निष्ठेचा गड आहे असे प्रसंशोद्गार जागतिक शांतीदूत श्री श्री रविशंकरजी यांनी काढले.
येथील सैनिक स्कूलच्या पटांगणावर आयोजित लाखो साधकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ताण तणाव मुक्तीचा आर्ट शिकवणार्य रविशंकरजी यांच्या आगमनाने सैनिक स्कूलच्या पटांगणावर चैतन्य निर्माण झाले. सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, चिपळूण, कराड येथून आलेल्या लाखो साधकांच्या उपस्थितीत श्री श्री रविशंकरजी यांनी सुमारे 200 फूटाच्या रॅम्पवर चालत अभिवादन स्विकारले. यावेळी साधकांनी दिलेल्या भेटीचा स्विकार करत त्यांनी सातारकरांची मने जिंकली.
रविशंकरजी यांच्या आगमनापूर्वी सातार्यातील मल्लखांबपटूंनी सादर केलेली प्रात्यक्षिके, त्यानंतर प्रज्ञायोगाच्या विद्यार्थ्यांनी डोळे बांधून सादर केलेली प्रात्यक्षिके, तसेच रंगतारा ढोल पथकाने सादर केलेले बहारदार वादन आणि त्यानंतर सुमारे दोनशे मृदुंगांनी लावलेला हरिनामाच्या गजरातच श्री श्री रविशंकरजी यांचे आगमन झाले. यावेळी साधकांनी उभे राहून त्यांना अभिवादन केले.
सैनिक स्कूलच्या मैदानावर सर्वत्र अत्यंत चोख बंदोबस्तात झालेल्या या कार्यक्रमासाठी संयोजकांनी लहान मोठे स्क्रिन उभे केले होते.
यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत आशिर्वाद घेतले. यावेळी रविशंकरजी यांनी छत्रपती शिवरायांची जिरेटोप तसेच संपूर्ण पोशाख देवून सत्कार करण्यात आला. काही वेळ संवाद साधून गुरुजींनी सर्वांसोबत भजनाचा आनंद घेतला.

