Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीचिखली धरणातील पाणी लवकरच शिवारात खेळणार : आ.श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले

चिखली धरणातील पाणी लवकरच शिवारात खेळणार : आ.श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले

साताराः सातारा तालुक्यातील  चिखली व जांभे या दोन गावांच्या सिमेवर चिखली धरण उभारण्यात आले आहे. 2001 मध्ये या धरणाचे काम पुर्ण झाले मात्र, पाणी विरतरण कालव्यांसाठी निधी उपलब्ध नसल्याने या तलावातील पाणी सिंचनासाठी वापरता येत नव्हते. दरम्यान, आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून या धरणाच्या बंदीस्त पाईपलाईनसाठी 14 कोटी 38 लाख 47 हजार रुपये निधी उपलब्ध झाला असून या सुधारीत निधीस नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाल्याने लवकरच चिखली धरणातील पाणी शेतकर्‍यांच्या शिवारात खेळणार आहे.
सातारा शहराच्या पश्‍चिमेस 45 किलोमीटर अंतरावर चिखली लघु पाटबंधारे योजनेंतर्गत चिखली धरण उभारण्यात आले आहे. या धरणाचा एकूण पाणीसाठा 66.50 द.ल.घ. फू. आहे. या तलावाद्वारे चिखली, जांभे, चोरगेवाडी व आसपासच्या गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार आहे. दरम्यान, धरणाचे काम पुर्ण झाले असून या धरणातील पाणी डावा आणि उजवा कालव्याद्वारे बंदीस्त पाईपलाईन करुन शेतीला दिले जाणार आहे. डाव्या कालव्याची लांबी 1.90 किमी असून त्याद्वारे 132 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. उजव्या कालव्याची लांबी 2.90 किमी असून त्याद्वारे 263 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. बंदीस्त पाईपलाईनद्वारे चिखली धरणाचे पाणी शेतीला दिले जाणार आहे. दरम्यान, धरण पुर्ण झाल्यानंतर कालव्यांसाठी म्हणजेच बंदीस्त पाईपलाईनसाठी निधी उपलब्ध होत नव्हता. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यासदंर्भात जलसंपदामंत्र्यांची भेट घेवून निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. तशा आशयाचे निवेदनही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री ना. गिरीष महाजन यांना दिले होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे चिघली धरणासाठी 14 कोटी 38 लाख 47 हजार रुपये या निधीला द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जलसंपदामंत्री ना. महाजन याचे आभार मानले आहेत. दरम्यान, सद्यस्थितीला आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुचनेनुसार चिखली धरणापासून काढण्यात येणार्‍या डाव्या व उजव्या या दोन बंदीस्त पाईपलाई कालव्यांचा सर्व्हे पाटबंधारे विभागाने पुर्ण केला आहे. तसेच बंदीस्त पाईपाईनचे डिझाईनही तयार करण्यात आले आहे. आता निधी उपलब्ध झाला असल्याने लवकरच बंदीस्त पाईपलाईनचे काम सुरु होणार आहे.
त्यामुळे येत्या काही दिवसांत चिखली धरणातून शेतकर्‍यांच्या शेतात प्रत्यक्ष पाणी खळाळणार आहे. प्रशासकीय सोपस्कार पुर्ण करुन तातडीने बंदीस्त पाईपलाईनचे काम हाती घ्यावे. काम दर्जेदार करावे, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधीत अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular