Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीमहसूल अधिकार्‍यांच्या धास्तीने टेम्पो चालक रस्त्यावर वाळू ओतून फरार

महसूल अधिकार्‍यांच्या धास्तीने टेम्पो चालक रस्त्यावर वाळू ओतून फरार

पाटण : भाडळी, खु॥ तालुका फलटण येथे पाझर तलावामध्ये बेकायदेशीर बिगरपरवाना वाळू वाहतूक करीत असताना मिळलेला टेम्पो महसुल विभागाने जप्त करण्या ऐवजी खुद्द अधिकार्‍याने त्या वाहनाची चावी वाहन मालकास देऊन वाहन पोलिस ठाण्यात नेण्यासाठी सांगितले असता सुमारे 500 मीटर गाडी पुढे चालवून  मंडलअधिकारी व तलाठ्याने समोरच त्यातील वाळू रस्त्यावर ओतून वाहन घेऊन पसार झाल्याची  घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की भाडळी तालुका फलटण येथे अवैध वाळू उपसा चालू असलेची माहिती फलटण तहसीलदार विजय पाटील यांना मिळाली ती वाहने ताब्यात घेण्यासाठी मंडलअधिकारी अभिजित सोनवणे व दुधेबावी, कुरवली, उपळवे, भाडळी,  दुधेबावी येथील तलाठी व कोतवाल यांना पाठवून तपासणी केली असता ते दिनाक 12 रोजी 11.40 वाजता शासकीय वाहनाने तिथे गेले त्या ठिकाणी त्यांना वाळूने भरलेला टेम्पो नं. एम एच  20 एटी  8361 मिळून आला हे सर्व वाहनजवळ जात असताना पथकास पाहून वाहन चालक पळून गेला. सदर वाहनाची चावी ताब्यात घेऊन त्या मधील 2 ब्रास वाळू 10 हजार रुपये किमतीची मिळून आली त्या नंतर थोड्याच वेळात त्याठिकाणी सदर वाहनाचा मालक संतोष हिरामण विटकर राहणार फलटण तेथे आला व तो म्हणाला की मला चावी द्या मी ते वाहन पोलिस ठाण्यात नेऊन लावतो असे म्हणू लागला त्यावर त्याला अधिकार्‍यांनी चावी दिली असता पाचशे मीटर पुढे चालवून डम्पिंग वरती करून वाहनात असलेली वाळू रस्त्यावर खाली करून वेगाने वाहन घेऊन पसार झाला. या बाबतीत शासकीय कामात अडथळा आणले प्रकरणी संतोष हिरामण विटकर याचेवर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याची फिर्याद तलाठी सोमनाथ महादेव पंडित यांनी दिली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.
  1. ( संग्रहित छायाचित्र)
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular