Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीजयवंत शुगर्सचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात

जयवंत शुगर्सचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात

कराड : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात 7 लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी कारखान्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रयत्न करून, गेल्या हंगामापेक्षा अधिक सरस कामगिरी करावी, असे आवाहन कारखान्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी केले. जयवंत शुगर्सच्या 8 व्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी कारखान्याचे सिनिअर मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट भाऊसाहेब चव्हाणके व त्यांच्या पत्नी सौ. भावना चव्हाण यांच्या हस्ते धार्मिक विधी करण्यात आले. त्यानंतर डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. याप्रसंगी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की जयवंत शुगर्सने कमीत कमी कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करत साखर उद्योगात आपली छाप निर्माण केली आहे. कारखान्याने सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, प्रोसेस व मॅन्युफॅक्चरिंग अशा सर्वच आघाड्यांवर चांगली कामगिरी केलेली आहे. गेल्या हंगामात कारखान्याची 13 टक्के इतकी रिकव्हरी राहिली असून, गेल्या हंगामाच्या एक पाऊल पुढे जाणारी कामगिरी यंदाच्या हंगामात आपल्याला करायची आहे. जयवंत शुगर्सचा डिस्टलरी प्रकल्पही लवकरच कार्यान्वित केला जाणार असून, महाराष्ट्रात व देशात जयवंत शुगर्सचे नाव पोहचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी चोरे गावचे माजी सरपंच दत्तात्रय साळुंखे, धावरवाडी सोसायटीचे चेअरमन महादेव चव्हाण, चोरे सोसायटीचे चेअरमन शैलेश साळुंखे, बबन चंदुगडे, विश्‍वास कदम, जयवंत शुगर्सचे सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर, वर्क्स मॅनेजर आर. आर. इजाते, चिफ केमिस्ट जी. व्ही. हराळे, प्रशासकीय अधिकारी ए. आर. पाटोळे, खरेदी अधिकारी वैभव थोरात, शेती अधिकारी एन. जे. कदम, चिफ अकौटंट आर. एस. चन्ने, सिव्हिल इंजिनिअर शब्बीरहुसेन शेख, कामगार अधिकारी संजय भुसनर, डिस्टलरी मॅनेजर सुरेंद्र भिंताडे, इन्स्ट्र्रुमेंट मॅनेजर ए. बी. खटके, इरिगेशन इंजिनिअर आर. एस. नलवडे, सहाय्यक सुरक्षा अधिकारी जालिंदर यादव यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि ऊसउत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular