पाटण:- मुख्यमंत्री कोयनेत येऊन लेखी अस्वासन देत नाहीत तो प्रयन्त कोयना प्रकल्प ग्रस्तआंदोलन स्थळावरून उठणार नाहीत. महाराष्ट्राला उजेडात आणून स्वतः अंधारात राहणाऱ्या कोयना प्रकल्प ग्रस्तानी कोयना धरणासाठी मोठा त्याग केला आहे, जागांच्या कल्याणा संताच्या विभूती याप्रमाणे “महाराष्ट्राच्या विकासाठी कोयना प्रकल्प ग्रस्ताच्या जमिनी ”
कोयना बहूउद्देशीय प्रकल्पासाठी 40 रुपये दराने संपादित करून व पाणलोट क्षेत्राबाहेरील जमिनी चोरून घेऊन वनविभाग आणि शासनाने या प्रकल्प ग्रासतांची घोर फसवणूक केलीच आहे ,व कोयना प्रकल्प ग्रस्ताना वाऱ्यावर सोडून त्यांच्या जीवनात अंधार निर्माण करणाऱ्या शासनाविरुद्ध कोयना प्रकल्प ग्रस्तानी 23 जानेवारी ते 26 जानेवारी या काळात सातारा जिल्हाअधिकारी कार्यालयासामोर आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन केले होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परदेशी दौऱ्यावर गेले असताना जिल्हाधिकारी यांनी प्रकल्प ग्रसतांचे नेते डॉ भारत पाटणकर आणि प्रकल्प ग्रसतांचे शिष्टमंडळ यांच्याशी चर्चा केली 15 दिवसात निवाडे संकलन आणि अवार्ड क पत्रक यांची जुळवाजुळव करून शासन स्थरावरील मुद्दे मुंख्यमंत्राच्या कार्यालायला कळविले मात्र मुख्यामंत्री परदेश दौर्यावरून परत येऊन 1 महिनाहुन जास्त दिवस झाले तरीही त्यांनी कोयना प्रकल्प ग्रस्ताच्या मागणी निवेदनाकडे ढुंकूनही पाहिले नाही असे दिसते आहे ,त्यामुळे पुन्हा कोयना प्रकल्प ग्रस्त कोयनानगर येथे दिनांक 26 फेब्रुवारी पासून बेमुदत ठिय्या आंदोलनास बसले आहेत आज तिसरा दिवस असूनही जिल्हाधिकारी किंवा तहसील दार यांनी सुद्धा प्रकल्प ग्रस्तांच्या आंदोलनाकडेफिरकले नाहीत.
कोयना प्रकल्प ग्रस्त गेली 64 वर्ष आपल्या न्याय मागण्यांसाठी शासन दरबारी चकरा मारत आहेत मात्र शासकीय अधिकारी प्रकल्प ग्रस्ताना चेंडूसारखी टोलवा टोलवी करतात,जमीन मागणी किंवा तत्सम मागणी घेऊन गेले की जुन्या पुरण्या कागद पत्रांची घोडी नाचवायला लावतात जुने कागद पत्रे गोळा करताना त्या प्रकल्प ग्रासतांची दमछाक होते ,एकंदरीत कोयना प्रकल्प निर्माण झाला तो देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलणारे धरण आहे मात्र धरण जेवढे मोठे तेवढ्या प्रकल्प ग्रस्ताच्या व्यथा ही मोठ्या होत गेल्या कोयना धरण निर्माण झाले तेव्हा कोणताही कायदा झाला नव्हता,मात्र कोयना धारणानंतर झालेली सर्व धरणासाठी शासनाने योग्य पुनर्वसन करून कोयना प्रकल्प ग्रस्ताची अवहेलना चालविली आहे .
“आधी धरण मग पुनर्वसन” मात्र कोयनेच्या बाबतीत “आधी धरण मग कायदा आणि पुनर्वसन,” हीच अवस्था झालीय, प्रथम कोयना प्रकल्पासाठी आणि नंतर अभय आरण्यासाठी जमीन संपादित करून कोयना प्रकल्प ग्रस्ताना बेघर तर केले पण उघड्यावर आणले ,गेले दोन तीन दिवस कोयनानगर येथील छ, शिवाजी महाराज मैदानावर आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा ,धरण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, यांसारख्या घोषणांनी कोयनानगर दणाणून गेले आहे, अशा घोषणा देत कोयना प्रकल्प ग्रस्तानी कोयनानगर येथील सह्याद्री व्याघ्र राखीव सहायक वनरक्षक (वन्यजीव ) कोयना यांचे कार्यालयातवर मोर्चा घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे व त्यावर सविस्तर चर्चा केली ,दिवसेंदिवस वाढत जाणारीव आंदोलनात सहभागी होणारी कोयना धरण ग्रसतांची संख्या ही शासनाला नक्कीच विचार करायला भाग पाडेल शांततेच्या मार्गाने चालू असणारे आंदोलन उग्र रूप धारण करू नये एवढीच सहानुभूतीपूर्वक अपेक्षा आहे ,गुन्हेगार कोणी नसतो पण त्यास परिस्तिथी गुन्हेगार बनवत असते ,शासनाने या प्रकल्प ग्रस्ताना गुन्हेगार बनवू नये, कोयना प्रकल्प ग्रसतांची शासनाकडून चोरून घेतलेल्या प्रकल्प ग्रस्ताच्या जमिनीवर वन विभागाने आपले बस्तान बसवून कोयना विभागातील जनतेला अभय अरण्य ग्रस्त व व्याघ्र प्रकल्प ग्रस्त बनवून एक प्रकारे तुघलकी कारभार चालविला आहे , आज कोयना प्रकल्प ग्रस्तानी आपल्या विविध मागण्यांसाठी सहययक वन संरक्षक वन्यजीव कोयनानगर येथे मोर्चा काढून आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले यावेळी शासन स्थरावरील मागण्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवल्या आहेत ,आणि स्थानिक मागण्यांवर त्वरित कार्यवाहिला सुरुवात केली जाईल असे सांगितले ,यावेळी कोयना विभागातील प्रकल्प ग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होती,यावेळी कोयना विभागातील 20 ग्रामपंचायतींनी मोर्चा ला आपला पाठिंबा दिला , कोणीही अधिकारी या आंदोलनाकडे फिरकले नाही ,दाजी पाटील डी डी कदम चैतन्य दळवी ,सीताराम पवार ,विठ्ठल सपकाळ संजय लाड सचिन कदम महेश शेलार संभाजी चाळके बळीराम कदम उपस्थित होते ,