पाटण:- सातारा लोकसभेची जागा हि आर.पी.आय. ची आहे. २०१४ साली सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीने मित्रपक्ष आर.पी.आय. ला सोडली होती. सेना-भाजप या मित्रपक्षांचे काही पदाधिकारी आमच्यासोबत राहिले. तर काहींनी बंडखोरी करून आमचा फज्जा उडवला. मोदी लाटेत किमान दोन नंबरचे तरी मते मिळायला पाहिजे होती. मात्र तसे झाले नाही. महायुतीतील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आमच्या बरोबर गद्दारी केली. गेले साडेचार वर्षांत या सरकारने साधे मिटींगला बोलावले नाही. या वर्षात केलेली प्रतारणा व मस्करी म्हणून सातारा लोकसभेची जागा आरपीआय ला कायम ठेवून आम्हाला निवडून देण्याची हमी महायुतीने द्यावी. जिल्ह्यातील सेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आघाडी धर्म पाळावा. नाहीतर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा आर.पी.आय. चे सातारा जिल्हा अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी पाटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)
सातारा जिल्हा आयोजित गुरुवार दिनांक १५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता गांधी मैदान सातारा येथे होणार्या एल्गार मेळाव्याच्या नियोजनासाठी पाटण येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पाटण तालुक्यातील आर.पी.आय. च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक पार पाडली त्या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव प्रा. रविंद्र सोनावले, जयवंत विरकायदे, अशोक मदने, पाटण तालुकाध्यक्ष प्राणलाल माने, विजय थोरवडे, दिपक भोळे, मधुकर गायकवाड यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अशोकराव गायकवाड पुढे म्हणाले की. गेल्या साडेचार वर्षांत झालेली प्रतारणा, समाजातील अस्पृश्यता, भिमाई स्मारकासाठी आमणे बंगल्याचा १२ वर्षे दिलेला लढा, या लढ्याच्या अनुषंगाने १४ एप्रिलला आमणे बंगल्यात प्रवेश मिळावा. भिमाईने जगाला असा पुत्र दिला ज्याने वर्ण व्यवस्था बदलली. सामाजिक समता प्रस्थापित केली. अशा महामाणवाच्या आईचे स्मारक साता-यात आहे. ही बाब प्रेरणादायी आहे. हे स्मारक होऊ नये हिच खंत आसुन आमच्यावर आजवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा यल्गार मोर्चा आहे. बाबासाहेबांच्या सन्मानासाठीच हा यल्गार मोर्चा काढण्यात येत आहे. यासाठी जिल्हाभर दौरा सुरू आसुन मोठ्या संख्येने लोक यल्गार मोर्चात सहभागी होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगुन पुढे म्हणाले कि मराठा समाजातील तरुणांना जातीचे पुरावे देऊनही दाखले मिळत नाहीत. दाखले मिळाले तर नोक-या मिळत नाहीत अशा अधिका-यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. सामान्य माणसाला मानवता धर्मानुसार न्याय मिळत नाही.
पाटण तालुक्यातील नाटोशी येथे दलित वस्ती सुधार योजनेतून मंजूर झालेला साकवपूल इतरत्र बांधला असून त्या सबंधित अधिका-यांच्यावर अॅट्रासिटी दाखल करावी अन्यथा सीईओंच्या केबिन मध्ये आंदोलन करु. असा इशारा देखील त्यांनी दिला.
तसेच निकृष्ट दर्जाच्या वाळुमुळे जनतेची घरे निकृष्ट दर्जाची होत आहेत. गरिबांच्या वाळू उपशावर कारवाई होते व श्रीमंतांची हजारो ब्रास वाळू मुकाट सोडली जाते. मोठ्या वाळू सम्राटांना वाचविण्यासाठी छोट्या वाळू व्यवसायिकांच्यावर कारवाई पाटणचे प्रांताधिकारी यांनी केली आहे. असा आरोप यावेळी अशोकराव गायकवाड यांनी केला.