सातारा : आंतरराष्ट्रीय मुंबई मॅरेथॉन रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली. सातारा जिल्हातून 42 फुल आणि 21 हाफ मुंबई मॅरेथॉनवर झेंडा फडकविला. सातारा जिल्हातुन सुमारे 100 च्यावर धावपटू सहभागी झाले होते.
सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, यांच्यासह डॉ. दीपक बनकर, सुभाष भासले, सुनील पानसे, सुनील फडतरे, सुधीर पवार, वैभव पोतदार, निरंजन पिसे, डॉ. अशोक पिसाळ, डॉ. राजेश शिंदे, डॉ. अविनाश भोसले, दिपक राव, राजेश, डॉ. संदीप भोईटे, हेमल उपाध्ये, डॉ. देवदत्त देव, डॉ. अश्विनी देव,राजेश काटकर यांनी 42 की. मी. अंतर चार ते पाच तासात यास्वीपणे पूर्ण केले. तर 42 की. मी. चे पेसर रन म्हणून नवनाथ दिगे, विनय रावखंडे, रामसिंगही धावले.
हाफ 21 की. मी. मॅरेथॉनमध्ये राजेंद्र गायकवाड, आशुतोष गोडबोले, बाळासाहेब लेंभे, कमलेश पिसाळ, पल्लवी पिसाळ, रोनक, उपाध्ये, विठ्ठलराव जाधव, मिलिंद हळबे, भाविक मुता, सिद्धार्थ बोकील, अभीषेक भंडारी, श्रुती भंडारी, अजय बैताडे, देयवांनी भोसले, सचिन मालवणकर, सचिन घाडगे यांनी दोन तासांच्या आत पूर्ण केले.