ठेकेदार करतात नेत्यांचे तर कार्यकर्ते- रहिवाशी करतात खड्ड्यांचे वाढदिवस
सातारा :-विकास कामे न करताही मोठा गाजावाजा करणारे सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तथा एका नेत्यांचा आज वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी व जाहिरात बाजी काही ठेकेदारांनी केली होती. तरी त्या शेजारी असलेली वास्तवता जनतेसमोर आणण्यासाठी सातारा जिल्ह्यात जुनी खेड हद्दीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा नेते प्रतिक गायकवाड व शिवांजली , कोयना सोसायटीच्या रहिवाशांच्या वतीने रस्त्यात पडलेल्या खड्ड्याचा निषेधार्थ उपहसात्मक खड्डे का बर्थडे साजरा केला. हा बर्थडे साजरा करताना केक कापण्यात आला तसेच या खड्ड्याला शाल गुंडाळली. खेड भागातील लोक व शेतकऱ्यांना सातारा शहरात येण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो. रस्त्याच्या दुतर्फा खड्डे पडलेले आहेत.
त्यापैकी सातारा नगर पालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्यातप्रतीकात्मक आंदोलन प्रतिक गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी केले.या ठिकाणी आंदोलकांनी बिर्याणी भोजनाचाही आस्वाद घेतला . लोकप्रतिनिधींनी या रस्त्याबाबत काळजी घेणे अपेक्षित असताना दुर्लक्ष केल्यामुळे हा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.यावेळी स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, सध्या पावसाळ्याचे दिवस असून रस्त्यांमध्ये खड्डे पडलेले आहेत आजूबाजूच्या परिसरात झाडं झुडपं वाढलेले आहेत. त्यामुळे सरपटणारी प्राणी यांचा त्रास सहन करावा लागतो. मोठ्या प्रमाणात डास मच्छर झाल्यामुळे रोगराई पसरलेली आहे. या सर्व गोष्टीचा त्रास असून सुद्धा याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा निषेधार्थ हे आंदोलन झाले . खेड म्युझिक महामार्गावरील पुन्हा शेजारीच मोठे खड्डे पडलेले आहेत त्याच्या शेजारी बॅनरबाजी व जाहिरात बाजी होत असल्याने लोकांचे लक्ष बॅनर बाजी पेक्षाही खड्ड्याकडे जास्त जात आहे .त्यामुळे आजच्या आंदोलनामुळे ज्यांचा या खड्ड्याची संबंध आहे अशा लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी रहिवाशांनी केलेली आहे. राजकीय नेत्याला लाजवेल अशा पद्धतीने फटाक्याची आतिषबाजी घोषणाबाजी व केक कापून सदर खड्ड्याचा वाढदिवस साजरा करताना घेतला या रस्त्याची केल्यास त्याचे मोठ्या प्रमाणात संबंधित लोकप्रतिनिधीचा सत्कार करण्यात येईल असेही आंदोलकांनी स्पष्ट केले.