सातारा : सातारा शहराजवळील त्रिशंकु भागातील नव्याने महसूली गावाचा यापूर्वीच दर्जा मिळालेल्या संभाजीनगर येथील ग्रा. पं. मधील वार्ड क्र. 3 बारावकरनगर तर विलासपूर ग्रा. पं. मधील वार्ड क्र. 2 साठी जानेवारी 2018 मधील शेवटच्या आठवड्यात पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान दोन्ही गावच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्राथमिक स्वरुपात मतदार याद्या मंगळवारी जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने दोन्ही महाराजाचे मनोमिलन यापूर्वीच तुटल्याने खा. उदयनराजे भोसले गट व आ. शिवेंद्रराजे गटात निवडणूक प्रतिष्ठेची होणार असे संकेत मिळाले आहेत.
कोडोली जि. प. गटातून साविआ मधून अर्चना देशमुख या निवडून आल्याने त्यांनी संभाजीनगर ग्रा. प. वार्ड क्र. 3 बारावकरनगरमधील ग्रा. पं. सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. बारावकरनगर मधील वार्ड क्र. 3 मध्ये एकूण 800 ते 850 मतदाराची अंतीम यादी तयार झाली असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार चव्हाण यांनी प्रारुप मतदान यादी प्रसिध्द केली आहे. तर विलासपूर ग्रा. प. सदस्य आशितोष चव्हाण यांनी गोडोली गणातून पं. स. साठी निवडणूक लढवून विजयी झाल्याने त्यांनी ग्रा. पं. सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे रिक्त झालेल्या वार्ड क्र. 2 साठी पोटनिवडणूक होणार आहे. संभाजीनगर व विलासपूर ग्रा. प. पोटनिवडणूकीनंतर राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जि. प. व पं. स. निवडणूकी दरम्यान माजी पं. स. सदस्य आनंदराव कणसे व माजी उपसरपंच सतिश माने हे मामा, भाचे एकत्र आल्याने बारावकरनगर वार्ड क्र. 3 ची पोटनिवडणूकीचे पारडे कणसे व माने यांच्या बाजूने जाईल कशी चर्चा आहे. तर जि. प. सदस्या सौ. अर्चना देशमुख, उपसरपंच सुभाष मगर यांनी खा. उदयनराजे भोसले यांचा कानमंत्र ऐकूण गटाची ताकद वाढविण्यावर भर दिला आहे. बारावकरनगर भारत विद्यामंदिर ते समर्थनगरला जोडणारा रस्त्याचे डांबरीकरण, खडीकरण कामाचा शुभारंभ खासदार गटाने धुमधडाक्यात करुन विकासकामांचा श्रीगणेश केला आहे. तर विलासपूर मध्ये पोटनिवडणूक दोन्ही गटाकडून प्रतिष्ठेची केली जाणार असून प्रत्यक्षात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींला निश्चित स्वरुपात उत येणार हे मात्र निश्चित.
संभाजीनगर व विलासपूर ग्रा. पं. साठी प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूकीचा बिगुल वाजणार ; खा. उदयनराजे गट व आ. शिवेंद्रराजे गटात रस्सीखेच होणार
RELATED ARTICLES