Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीचौकशी न करता स्थानिक शाळा प्रशासनाला पोलीस यंत्रणेने त्रास देवू नये ;...

चौकशी न करता स्थानिक शाळा प्रशासनाला पोलीस यंत्रणेने त्रास देवू नये ; सेंट पीटर्स स्कूलमध्ये पालकांमधील बैठकीत सूर

भिलार :  पांचगणी या विद्येच्या माहेरघरात सर्व शाळा शासनाच्या नियमानुसारच ज्ञानदान करतात प्रवेश फॉर्म भरून घेणे हा गुन्हा आहे का ? पालकांच्या तक्रारी आल्यावर पोलिसानी शहानिशा करूनच स्थानिक शाळा प्रशासनावर कारवाई करावी, चौकशी न करता विनाकारण स्थानिक शाळा प्रशासनाना त्रास देण्याचे काम पोलिस यंत्रणेने करू नये असा सूर सेंट पिटर्स स्कूल येथे शाळा व होस्टेल चालकांच्या बैठकीत आज दिसून आला.
पांचगणी येथे सुमारे 40 मराठी व इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळा आहेत हजारो विद्यार्थी येथे दरवर्षी शिक्षण घेत आहेत. पालक, विद्यार्थी, शाळा प्रशासन यांच्यात कधी कधी तक्रारी निर्माण होतात आणि त्या पोलीस दरबारी येतात. यासाठी पांचगणी पोलीस ठाण्याच्या वतीने सपोनि तृप्ती सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी  सुरक्षा आणि शाळा प्रशासनाना मार्गदर्शन याविषयी बैठक आयोजित केली होती.
संस्था चालक शाळेत प्रवेश देताना नियमांना अधिन राहून प्रवेश प्रक्रिया राबवित असतात परंतु पुढे जाऊन हेच पालक शैक्षणिक फी भरताना फी टाळण्यासाठी अनेक कांगावे करीत खोटेनाटे आरोप करून विनाकारण खोटे गुन्हे दाखल करतात. पोलिसानी गुन्ह्याची सत्यता पाहूनच कारवाई करावी माझी चूक नसताना माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून मला व माझ्या मुलांना अटक करण्यात आली त्यामुळे माझी माझ्या शाळेची व कुटुंबाची नाहक बदनामी झाली व मानसिक त्रासहि झाल्याचे  माजी सभापती व गुरुकृपा स्कूलचे संस्थापक मारुती सोनटक्के यांनी निदर्शनास आणून दिले यावर सर्व संस्था चालकांनी दुजोरा देऊन त्यांचेवर अन्याय झाल्याचे नमूद केले.
नियमांना अधिन राहून आम्ही सर्वजण प्रवेश प्रक्रिया पूर्ण करत असतो काही बेजबाबदार पालक कुठलेही कारण नसताना केवळ फी बुडवण्यासाठी  खोटे गुन्हे दाखल करून शाळा प्रशासनाना त्रास देत असतात त्यास चाप बसणे गरजेचं आहे त्याकरिता सर्वांनी एकत्र राहील पाहिजे. यास बर्‍याच शाळेच्या मुख्याध्यापकांनी  पाठिंबा दर्शविला आणि या पुढे जर पोलीस स्टेटशन मध्ये असा गुन्हा दाखल झाला तर प्रथमतः त्याची शहानिशा करण्यात येऊनच पुढील कारवाई केली जावी असे सांगितले. ज्ञानदानाचे पवित्र काम करताना आम्ही खरेच दोषी असेल तर आम्हालाही सोडू नका पण खोटया तक्रारी दाखल करणार्‍या पालकांना पाठीशी न घालता सत्यता पाहावी असेही सर्वांनि संगितले.
सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे म्हणाल्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल होणार्‍या शालेय गुन्ह्यात पूर्ण चौकशी अंतीचं आम्ही कारवाई करीत असतो.
परंतु अशा वेळी काही शाळा प्रशासने गुन्हे दडवतात, माहिती पूर्ण देत नाहीत आणि आमच्या चौकशीत अपूर्ण माहिती देतात त्यामुळे आम्हालाही अडचण निर्माण होते त्यामुळे तुम्ही सर्वानी सहकार्य करण्याची गरज आहे. तसेच प्रवेश अर्ज भरताना दोन साक्षिदारांच्या स्वाक्षरी करतानाचा फोटो घेण्यात यावा. म्हणजे उद्या अशा घटना घडल्यास आम्हाला कारवाई करणं सुलभ जाईल.
यावेळी शहरातील सर्व शाळा व हॉस्टेलचालक , मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular