Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीनगरपंचायतीच्या माध्यमातून पाटणचा सर्वांगिण विकास साधणार :- सत्यजितसिंह पाटणकर.

नगरपंचायतीच्या माध्यमातून पाटणचा सर्वांगिण विकास साधणार :- सत्यजितसिंह पाटणकर.

पाटण:- पाटण नगरपंचायती मार्फत पाटण मध्ये भरघोस कामं करणार आहे. जनतेच्या सेवेमध्ये तत्पर राहण्यासाठी आम्ही कठिबध्द असून पाटण चा सर्वांगिन विकास करणार आहे. पाटण नगरपंचायती कडून पाटण मध्ये अनेक विकास कामे सुरु केली असून लोकांना सर्वात चांगल्या सोईसुविधा लवकरच देण्यात येणार आहे. असे प्रतिपादन पं स मा सभापती सत्यजितसिंह पाटणकर यांनी नगरपंचायतीच्या वॉटर डी पी आर व घनकचरा व्यवस्थापन संदर्भातील चर्चासत्र व विचार विनिमय बैठकिमध्ये केले.

पाटण नगरपंचायती मार्फत रणजितसिंह पाटणकर स्मारकामध्ये युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वॉटर डी पी आर (२४×७) व घनकचरा व्यवस्थापन संदर्भात चर्चासत्र, विचार विनिमय करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमास युवानेते सत्यजितसिंह पाटणकर, पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुषमा महाराज, उपनगराध्यक्ष दीपक शिंदे, राष्टवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, समर्थ इन्फ्रा स्टक्चर चे डायरेक्टर कोलसकर व गाडे, घनकचरा निर्मुलनाचे निलेश राऊत तसेच नगरसेवक, नगरसेविका व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये सत्यजितसिंह पाटणकर बोलत असताना ते पुढे म्हणाले कि, नगरपंचायतीची निर्मिती झाली तेव्हा सर्व पदाधिकारी व कर्मचारी तसेच सदस्य ही नविनचं होते. कोणालाही अनुभव नव्हता. तसेच नगरपंचायतीचा कारभार हा सी ई ओ च्या मार्गदर्शनाखाली चालतो. नव्याने झालेल्या नगसपंचायतीला सी ई ओ दिले ते हि नव्याने भरती झालेले त्यामुळे ते वर्षातील आठ महिने रजेवरतीच राहिले. आत्ता ही कराडचे सी ई ओ नां अतिभार म्हणून पाटण नगरपंचायतीचा कारभार पाहावा लागतो. पाटण ला पूर्णवेल सी ई ओ नसल्याने अनेक अडचणींचा सामोरा करावा लागत आहे. वेगवेगल्या योजनेच्या अंतर्गत निधी येत असतो त्याचा योग्य ठिकाणी वाफर करावा लागतो. निकषांनुसार कामांचे वाटप करावे लागते. घनकचर्याच्या व्यवस्थापनाचे व २४×७ योजेचे टेंडर नोटिसा काढण्यात आल्या होत्या त्यांचा व्यवहार पारदर्शक झालेला आहे. लोक सहभागामधून ही कामे होणार असून या सर्व विकास कामं कामांमद्ये लोकसहभाग महत्वाचा आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक सचिन कुंभार यांनी केले त्यावेळी त्यांनी नगरपंचायती कडून सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. तसेच चार कोटी छत्तीस लाखांची कामे विविद वॉर्ड मध्ये सुरु आहेत. सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण मध्ये विकासकामे होत आहेत. दादांची मोलाची साथ नगरपंचायतीला असते. तसेच लोकांचे प्रश्न सोडवण्यास सर्व नगरसेवक व पदाधिकारी सदैव तत्पर असतो. येणार्या भविष्यकालामद्ये नगरपंचायतीला दीड कोटी निधी येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यानंतर समर्थ इन्फ्रा स्टक्चर सर्विस प्रा लि या कंपनीचे कोलसकर व गाडे यांनी २४×७ योजनेची माहिती दिली तसेच लोक सहभाग किती महत्वाचा आहे हे लोकांना पटवून दिले. यावेली लोकांनी आपले प्रश्न उपस्थित केले त्याचे योग्य निराकरण यांनी केले. तसेच जनधार सेवाभावी संस्थेचे निलेश राऊत यांनी घनकचरा निर्मुलनाच्या व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. त्यांचे काम कसे चालणार आहे याची ही प्राथमाक स्तरावरती लोकांना माहिती दिली. त्यावेली लोकांनी त्यांच्या समस्या विचारल्या त्याच्या समस्यांचे अनुरुप असे उत्तर ही त्यांनी दिले. त्याचबरोबर घनकचरा निर्मुलनामध्ये लोक सहभाग फार महत्वाचा आहे. लोकांच्या मदतीने व सहकार्याने स्वच्छ व सुंदर पाटण होऊ शकते हे ही त्यांनी या चर्चासत्रामध्ये सांगितले.
कार्यक्रमाचे आभार पाटण नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष दीपक शिंदे यांनी मांडले.

 

स्वच्छ भारत अंतर्गत काम करताना स्वच्छ भारत सर्वेक्षणामद्ये सर्वांचा सहभाग मोलाचा आहे. सन २०१८ च्या सर्वेक्षणामध्ये पाटण नगरपंचायतीला एक कोटी रूपयांचे बक्षिस मिलाले आहे. व सन २०१९ च्या ही स्पर्धेमध्ये पाटण नगरपंचायत सहभागी झालेली आहे याची माहिती पाटण नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष दीपक शिंदे यांनी दिली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular