Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीमेढा येथिल लसीकरणाची अवस्था"लांडगा आला रे आला" अशी होतेय

मेढा येथिल लसीकरणाची अवस्था”लांडगा आला रे आला” अशी होतेय

मेढा ( वार्ताहर ) मेढा येथिल ग्रामीण रुग्णालयातुन मिळत असणारी लसीकरणाची अवस्था ” लांडगा आला रे आला ” अशी झाली असून यामुळे स्थानिक नागरीकांतुन नाराजीचा सुर व्यक्त होत आहे.

मेढा ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत असून लसीकरणाबाबत ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. युवकवर्गााचे लसीकरण लवकर व्हावे हि अपेक्षा असताना लसींबाबत असणारा तुटवडा यांमुळे नागरीक आणि ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी यांची तु-तु- मै- मै पहावयास मिळत आहे. आता पहिला डोस घेणारा वर्ग अजुन “उपाशी “राहत असून दुसरा डोस घेण्याकरीता पहाटेपासून वाढत जाणारी रांग तरी “तुपाशी ” पोहोचणार का ?हा प्रश्न निर्माण होत आहे.

मेढा येथिल नागरीकांनी ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी यांचेकडे या लसींबाबत विचारणा केली असता बाहेर बोर्ड लावला आहे तो वाचा असे उत्तर मिळत असून अधिकारी वर्ग आपली जबाबदारी झटकत असल्याने ” कुंपणच शेत खाते की काय ” अशी अवस्था निर्माण झाली आहे. या लसींबाबत नक्की काय चालू आहे असे प्रश्न विचारताच या कमी पडणाऱ्या लसीकरणाबाबत वरिष्ठांना विचारा असे प्रतिउत्तर अधिकारी देत आहेत आणि याबाबत वरिष्ठांची माहिती व फोन नंबर घेण्याया प्रयत्न केला असता नागरीकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

एकंदरीत मेढा ग्रामीण रुग्णालयाच्या विभागाकडून लसीकरणा बाबत योग्य नियोजन झाले नसल्याने या लसीकरणाचा फायदा नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने पुरता फज्जा उडत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular