Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीअविश्वास ठरावाला स्थगिती दिल्याने विक्रमबाबा सभापती पदी कायम ; राज्याच्या पणन संचालकांनी...

अविश्वास ठरावाला स्थगिती दिल्याने विक्रमबाबा सभापती पदी कायम ; राज्याच्या पणन संचालकांनी दिली स्थगिती

पाटण :- पाटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर यांच्या वरील बाजार समितीच्या संचालकांनी आणलेल्या अविश्वास ठरावाला राज्याच्या पणन संचालकांनी स्थगिती दिली आहे, यामुळे सध्या तरी सभापतीपदी विक्रमबाबा पाटणकरच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे , याबाबतचे वृत्त पाटण मध्ये समजताच बाबा समर्थकांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला, त्यामुळे शनिवारी होणाऱ्या नवीन सभापती पदाची निवड पुढील आदेश होईपर्यंत रखडणार आहे,
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर यांच्या विरोधात बाजार समितीच्या संचालकांनी दि.२० डिसेंबर रोजी अविश्वास ठराव दाखल करून सभापती पदावरून हरवले होते, मात्र सदरचा अविश्वास ठराव हा पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा नमूद करत ठरावाच्या विरोधात विक्रमबाबा यांनी राज्याच्या पणन संचालकांकडे १९ जानेवारी रोजी अपिल करून ठरावाला स्थगिती मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता, या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली,या मध्ये विक्रमबाबा यांच्या विरोधात संचालकांनी मंजूर केलेल्या अविश्वास ठरावाला पुणे येथील पणन संचालकांनी पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती दिली, त्याबाबतचा आदेश शनिवार दि ३ रोजी विक्रमबाबा पाटणकर यांना प्राप्त झाला,
याबाबतचे वृत्त समजताच पाटण मध्ये समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला,
यामुळे पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विक्रमबाबा पाटणकरच राहणार आहेत,

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular