Monday, September 1, 2025
Homeठळक घडामोडीवाई नगरपालिकेच्या जलतरण तलावाच्या ठेकेदाराकडून वाईकरांची लुट

वाई नगरपालिकेच्या जलतरण तलावाच्या ठेकेदाराकडून वाईकरांची लुट

वाई नगरपालिकेने सांभाळलाय स्विमिंग पुलाचा पांढरा हत्ती
वाई: वाईकरांच्या जिव्हाळ्याचा असणारा स्विमिंग पूल बरीच वर्षाच्या प्रतीक्षेनंतरअखेर एप्रिल महिन्यात चालु झाला. स्विमिंग पूल चालू झाल्याने वाईकर नागरिकांच्यात व विशेषतः बालचमुंच्यात खुप आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. संबंधित ठेकेदारामूळे वाईकरांच्या सर्व ऊत्साहावर व आनंदावर विरजण पडले. स्विमिंग पूल चालु झाल्यापासून  लगेचच ठेकेदाराच्या आडपुठेपणामुळे त्याने आठ दिवस पूलबंद ठेवला. प्रशासकीय परवानगीचे कारण दाखवून वाईकरांची दिशाभुल केली. वास्तविक सर्व प्रशासकीय परवानगी घेऊनच जिल्हाधिकारी यांनी स्विमिंग पुलाचे उदघाटन केले होते.
त्यानंतर टँक चालू झाल्यावर खर तर दरपत्रक वाईतील सर्वसामान्य नागरिकांना परवडेल असेच ठेवायला हवे होते. तसे आश्वासन आमदार मकरंद पाटील यांनी या स्विमिंग पुलाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना दिले होते. मात्र संबंधित ठेकेदाराने सर्वसामान्य वाईकरांच्या आवाक्याबाहेरचे दरपत्रक ठेवुन वाईकरांच्या गळचेपीला सुरवात केली. आता या पुलाचा फक्त आर्थिक दृष्ट्या उच्चभ्रू लोकच लाभ घेवू शकतात. स्विमिंग ट्रेनिंगच्या नावाखाली अवाजवी व अतिरिक्त शुल्क आकारून वाईकरांची घोर फसवणूक करण्यात येत आहे. वास्तविक सर्वांना मोफत स्विमिंग शिकवण्याची जबाबदारी पूल मॅनेजमेंटची असुन ते लोक या गोष्टीसाठी दुपटीने शुल्क आकारत आहेत. आपल्या पाल्यांना घेऊन येणार्‍या अनेक पालकांना कोणतेही अधीकार नसताना वाट्टेल तसे बोलुन वाईकरांची अपमान करीत आहेत. यामुळे अनेकवेळा वादाचे प्रसंग घडताना दिसत आहेत. स्विमिंग करीत असताना उडी मारण्यासाठी केलेला कठडा चांगला असताना नादुरुस्त असल्याची पाटी स्वतःच्या सोईसाठी लावण्यात आली आहे. तसेच स्विमिंगसाठी लागणार्‍या सर्वच गोष्टी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत परंतु त्या निकृष्ट दर्जाच्या आहेत. स्विमिंग टँकवर ठेवलेला स्टाफ हा पोहण्याचे ट्रेनिंग घेतलेला नसुन त्यांनी ट्रेनींग देण्यासाठी आवश्यक पात्रता प्रशिक्षण पूर्ण केले आहे का? याचीही सखोल चौकशी करण्यात यावी. त्यांची नेमणूक कोणत्या पद्धतीने करण्यात आली आहे हे पण तपासून पाहण्याची वेळ आली आहे. अप्रशिक्षित स्टाफमुळे  दुर्दैवाने एखादा अपघात झालाच तर याची जबाबदारी नक्की कोण घेणार हेही वाई नगरपालिकेने स्पष्ट करावे, कृपया वाईकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार थांबवावा अशी मागणी जोर धरत आहे. त्वरित संबंधित ठेकेदारावर कारवाई करून त्यांचा करार रद्द करून समस्त वाईकरांना पोहोण्याचा आनंद मिळवून द्यावा अन्यथा ठेकेदाराविरुध्द रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारावे लागेल.
एकंदरीत हा स्विमिंग पूल हासमस्त वाईकरांना अर्पण केला आहे. की संबंधित ठेकेदाराला अर्पण केला आहे, याचाही खुलासा करण्यात यावा?वास्तविक वाई नगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजुक आहे. वाई नगरपालिकेला आर्थिक उत्पन्नाची आवश्यकता आहे.असे असताना सदर ठेकेदार वाई नगरपालिकेचे देखील आर्थिक नुकसान करताना दिसत आहे.  माझी समस्त वाईकरांना विनंती आहे की संबंधित दिशाभूल करणार्‍या  या ठेकेदाराचा करार रद्द करण्यासाठी वाईकरांनी एकत्र येवून प्रयत्न करणे गरजेचे दिसत आहे.आमदारांनी इतक्या प्रयत्नांनी वाईकरांना उन्हाळ्यासाठी स्विमिंग पुलाची दिलेली हि भेट वाईकरांसाठी न राहता ठेकेदारांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोबंडी ठरत आहे. वाईकरांना आता नदीतही पाण्याअभावी पोहता येणार नाही व स्विमिंग पूल फक्त उच्चभ्रू लोकच लाभ घेताना दिसतील. सर्वसामान्य वाईकर मात्र स्विमिंग पुलाच्या कडेनेच बच्चे कंपनीला फिरवताना कायम स्वरूपी दिसतील. जवळ-पास दोन कोटी आणि पाच वर्ष खर्च करुन बांधलेल्या तलाव पण आनखीन एक पांढरा हत्ती  वाई करांनी पोसायला घेतला आहे.!! अशी तिखट प्रतिक्रिया वाईकरांमधून उठत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular