Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीमहिलादिनी पाटण नगरपंचायत महिला सफाई कर्मचारी यांचा सन्मान

महिलादिनी पाटण नगरपंचायत महिला सफाई कर्मचारी यांचा सन्मान

पाटण:- नेहमीच समाजाच्या आरोग्य दृष्टीने महत्व पुर्ण ठरणा-या महिला सफाई कामगार या समाजाच्या सन्माना पासून उपेक्षितच राहतात. ख-या अर्थाने त्यांचा सन्मान होणे हि सामाजिक बांधिलकी बाळगून ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पाटण तालुका पत्रकार संघाने पाटण नगर पंचायत मधील सर्व महिला सफाई कामगार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी पाटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर मोहिते म्हणाले जागतिक महिला दिनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आणि नेहमीच प्रसिध्दीच्या झोतात असणा-या महिलांचा सन्मान, सत्कार सगळीकडे साजरा होत असताना दिसतो. मात्र सामाजिक आरोग्य दृष्टीने महत्व पुर्ण ठरणा-या महिला सफाई कामगार या अशा कार्यक्रमापासून उपेक्षितच राहतात. केवळ त्यांचा मोठ्या कार्यक्रम समारंभात सफाई कामगार म्हणूनच वापर केला जातो. आणि त्यांच्याकडे पहाताना हि सफाई कामगार म्हणूनच पाहिले जाते. मात्र सामाजिक समृध्द आरोग्य दृष्टीने सफाई कामगार महिला या समाजाच्या स्वच्छता दुत आणि सर्वांपेक्षा श्रेष्ठ काम करणारे आहेत. म्हणूनच या महिलांचा सन्मान – सत्कार होणे म्हणजे त्यांच्या कार्यात सामाजिक उर्जा निर्माण करून देणे हे होय. अशा महिलांच्या कार्याबरोबर पत्रकार संघ नेहमीच बरोबर असून जागतिक महिला दिनी त्यांचा सन्मान राखला जात आहे. असे त्यांनी सांगितले.
राजेंद्र पवार म्हणाले कोणतेही काम कमी नाही. काहींचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कमी असतो. या कमी पणाची तमा न बाळगता चांगले केलेले काम श्रेष्ठच असते. पाटण नगर पंचायतीच्या माध्यमातून या महिला करत असलेले सफाई काम हे सर्वांच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ख-या अर्थाने या महिलांचे कार्य कौतुकास्पद असून ते सन्मानीत करण्यायोग्य आहे. जागतिक महिला दिनी या महिलांच्या कर्तृत्वाला पाटण तालुका पत्रकार संघाचा सलाम.
यावेळी नगरसेवक सचिन कुंभार म्हणाले स्वतः च्या कामावर विश्वास ठेवून पाटण नगर पंचायतच्या महिला सफाई कामगार काम करतात. स्वच्छता दुत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महिला आज पर्यंत सन्मान-सत्कार पासून वंचितच राहिल्या आहेत. पाटण तालुका पत्रकार संघाने सामाजिक दृष्टी ठेवून महिला सफाई कर्मचारी यांचा सन्मान केला. हा पाटण नगर पंचायतीचा गौरव आहे.
यावेळी आभार मानताना पत्रकार विद्या म्हासुर्णेकर-नारकर म्हणाल्या आज २१ व्या शतकात महिला पुरूषांच्या बरोबरीने काम करत आहेत. महिलांना आज सन्मानाची वागणूक मिळत आहे. कोणत्याही क्षेत्रात त्या कमी नाहीत. मात्र सामाजिक दृष्टीने महिला सफाई कर्मचारी या नेहमी सन्मान-सत्कारापासून उपेक्षितच राहतात. ख-या अर्थाने त्यांचे कौतुक होणे हे जागतिक महिला दिनी अपेक्षितच आहे. पाटण तालुका पत्रकार संघाने त्यांचा केलेला गौरव या महिलांना आणि पत्रकार संघालाही उर्जा देणारा ठरेल.
यावेळी पाटण नगर पंचायत मुख्याधिकारी अक्षय करमळकर, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संभाजी भिसे, कार्याध्यक्ष बाबासो सुतार, सातारा जिल्हा भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सौ.आयेशा सय्यद, पत्रकार विक्रांत कांबळे, नितीन खैरमोडे, सुरेश संकपाळ, दिनकर वाईकर, प्रविण जाधव, नगरसेवक बापूराव टोळे, नगरसेविका सौ. रश्मी राऊत, राजेंद्र राऊत, विष्णू चव्हाण आदी कर्मचारी नागरिक उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular