अकलुज : स्वतः वाह्यात खर्चात पडू नका, जोडीदारालाही खर्चात न पाडता विवाहबध्द होवून अत्यंत साधेपणाने जीवन जगत इस्लामी तत्वांना मजबुत करण्याचा संदेश मौलाना आझाद विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार हुसेन दलवाई यांनी अकलुज माळीनगर येथे बोलताना दिला .
माळीनगर येथे मुस्लीम समाजातील 11 जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने करण्यात आले होते. त्यावेळी खासदार श्री.दलवाई बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंहदादा मोहीते पाटील, जमियत उल्मा-ए-हिंद चे प्रदेश अध्यक्ष मौलाना नदीम सिध्दिकी, मौलाना ईब्राहीम कासमी, आमदार राम सातपूते, धैर्यशील मोहीते पाटील, धवलसिंह मोहीते पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष मुद्दसर पटेल. मौ. आ.वि.मंचचे प्रदेश सरचिटणीस हसीब नदाफ,युसूफ अन्सारी, मुस्लींम खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष सादिक खाटीक आटपाडी, सासवड माळी शुगर फॅक्टरीचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्रभाऊ गिरमे,प.म.प्रमुख शौकत पटेल,जिल्हाध्यक्ष ईस्माइल पटेल, अल्पसंख्यांक काँग्रेस चे अध्यक्ष हाजी तौफीक हत्तूरे,कल्याण चे सामाजिक कार्यकृते असलम पिंजारी, लातूरचे.एन.एम. ईनामदार, जाविद पटेल, ईरफान महाजन, जमिल खान, वसिम पठान, अमिन शेख आदीची प्रमुख उपस्थिती होती.
सामाजिक , आर्थीक, शैक्षणिक सह विविध क्षेत्रात मुस्लीम समाज खूप मागे असून लग्न वगैरे विविध समारंभात कर्ज करून पैशाची उधळण करण्याची वाढीस लागलेली वृत्ती समाजाला, कुटुंबाला हानीकारकआहे. अशा डामडौलाच्या कार्यक्रमात होणार्या खर्चाची बचत करून मुलांच्या शिक्षण, संस्कारावर खर्ची घालत आदर्श समाज निर्मिती हे इस्लामी स्वप्न सत्यात आणा, अशी अपेक्षाही खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे नियोजन भैय्या माढेकर, मोहसिन बागवान, जाविद तांबोळी, फारूक शेख, शरजिल शेख, पिरखान शेख, नाजिम खान,वाजिद बागवान, रहीम शेख,फारूक शेख, फारूक तिकोटे, बरकत बागवान आदी अकलूजच्या पदाधिकार्यांनी केले.
‘सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्ने करून समाज प्रगतीस हातभार लावा’
RELATED ARTICLES