औंध: औंध कृषी मंडल विभागातील सुमारे 35 गावातील एक हजार तीनशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती औंधचे मंडल कृषी अधिकारी विजय वसव यांनी दिली.
मागील काही दिवस झालेल्या पावसामुळे औंध, सि.कुरोली, पुसेसावळी, वडगाव (ज.स्वा.), राजाचे कुर्ले, पळशी, खरशिंगे, वरुड, भोसरे, अंभेरी, कोकराळे, लोणी, नांदोशी, वांझोळी, वडी, गोरेगाव वांगी, कळंबी, पारगाव, सि.कुरोली याप्रमुख गावांसह सुमारे पस्तीस गावांमध्ये मागील काही महिन्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील घेवडा, मूग, बाजरी, बटाटा, सोयाबीन, कांद,भुईमूग, आले, वाटाणा, पालेभाज्या तसेच अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे औंध येथील मंडल कृषी विभागाने या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. यामध्ये मंडलकूषी विभागासह महसूल विभाग तसेच ग्रामसेवक व अन्य विभागातील अधिकारी ही सहभागी झाले होते अशी माहिती औंधचे मंडलकृषी अधिकारी विजय वसव यांनी दिली. शेतकर्यांच्या शेतांमध्ये जाऊन या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात आले.
यावेळी शेतकर्यांशी चर्चा करण्यात आली. सध्या 35 गावातील सुमारे तीन हजार 400शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.
अजूनही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे काम सुरू आहे. यावेळी शेतकर्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आल्या. यावेळी कूषी सहायकएम.डी.मदने,यु.एम.तिकुटे,के.जे.जाधव, जी.बी.सपकाळ, व्ही.बी.काळे,के.आर.शिंदे, टी.बी.चव्हाण, एन.ए.कांबळे, के.जे.जाधव, एम.एम.गायकवाड, आर, एस.ठोंबरे आदी कर्मचार्यांचे पथक यामध्ये सहभागी झाले होते.
औंध कृषी मंडलातील 35 गावातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण: विजय वसव
RELATED ARTICLES

