औंध : औंध ता. खटाव येथील ग्रामपंचायतीच्या आज झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत दिपक नलवडे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली.
औंध ग्रामपंचायतीची निवडणूक गेल्या महिन्यात झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखालील श्रीयमाई विकास पनेलच्या सोनाली शैलेश मिठारी यांची अटीतटीच्या लढतीत लोकनियुक्त सरपंच पदी निवड झाली होती.
उपसरपंच निवडीसाठी आज सरपंच सोनाली मिठारी यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत श्री यमाई विकास पनेलच्या दिपक नलवडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पदाची निवडणूक पार पडताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण फटाक्यांची आतशबाजी करून जल्लोष केला.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली औंधमध्ये केलेल्या विकासकामाच्या जोरावर श्रीयमाई विकास पनेलने सरपंच पदासह नऊ जागा जिंकून ग्रामपंचायतीची निर्विवाद सत्ता हस्तगत केली होती.
ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी राजकन्या चारुशीला राजे पंतप्रतिनिधी यांनी जोरदार कंबर कसत आपल्या नेतृत्वाचा करीश्मा दाखवून विरोधी पनेलला पराभवाची धूळ चारली होती. या निवडणुकीत जगदंबा परिवर्तन विकास पनेलने सहा जागा तर एक ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. त्यामुळे आजच्या उपसरपंच पदाच्या निवडणूकीत परीवर्तन पनेलचे सदस्य कोणती भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र उपसरपंच पदाची निवडणूक न लढवता त्यांनी निवडणूकणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून मंडल अधिकारी प्रताप राऊत यांनी काम पाहिले.
नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचे गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, हणमंतराव शिंदे माजी सरपंच नंदीनी इंगळे, सचिन शिंदे, राजेंद्र माने, आब्बास आत्तार, वसंतराव माने, गणेश देशमुख, गणेश हरिदास, वाहीद मुल्ला, संदीप चव्हाण, भरतबुवा यादव, रमेश जगदाळे, इलियास पटवेकरी, बापूसाहेब कुंभार, युवराज रणदिवे, तुषार रणदिवे, सनातन रणदिवे, कुलदीप इंगळे, गणेश इंगळे, वामन पवार, महादेव जाधव, मंदार कुंभार, विक्रम शिंदे, विशाल ओतारी, शुभम इनामदार, शुभम शिंदे, श्रीपाद सुतार, रोहित मगर, विशाल भोसले आणि श्रीयमाई विकास पँनेलचे कार्यकर्ते ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
औंधच्या सरपंचपदी मिठारी तर उपसरपंचपदी नलवडे बिनविरोध
RELATED ARTICLES