Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीश्रद्धा सोनवणे- कदम यांनी पटकावला मिसेस महाराष्ट्र रिफ्रेशिंग ब्युटी किताब

श्रद्धा सोनवणे- कदम यांनी पटकावला मिसेस महाराष्ट्र रिफ्रेशिंग ब्युटी किताब

औंध: औधची सुकन्या, आयटी इंजिनिअर श्रध्दा सोनवणे -कदम यांनी पुणे येथे झालेल्या ब्युटी स्पर्धेत मिसेस महाराष्ट्र रिफ्रशिंग ब्युटी स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
दिवा पजंट (DIV­ Pageant) च्या वतीने आयोजित मिसेस महाराष्ट्र एम्प्रेस ऑफ महाराष्ट्र 2019 ची स्पर्धा पार पडली. देशविदेशातून महाराष्ट्र भूमीशी संबंधित स्पर्धक सहभागी झाले. वेगवेगळ्या कसोट्यावर आधरित गुणांक, लोकांचं मतदान आणि एक्स्पर्ट जुरी मेंबर चॉईस या आधारावर श्रद्धा यांना मिसेस महाराष्ट्र रिफ्रेशिंग ब्युटी 2019 किताब मिळाला.

कुटुंबिय व अन्य सामाजिक घटकांनी केलेल्या सहकार्यामुळे आपण हे यश संपादित करता आले असे श्रद्धा यांनी सांगितले. आयटी इंजिनिअर असलेल्या श्रध्दा सोनवणे यांना गडकोट किल्यांची सफर करणे.विविध ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास करणे याचीही आवड आहे. औंध येथील कला शिक्षक शिवाजी सोनवणे यांच्या त्या कन्या आहेत. विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular