Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीसीबीएसई परीक्षेत यश अडसुळे याचे सुयश

सीबीएसई परीक्षेत यश अडसुळे याचे सुयश

औंध : केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) 12 वीच्या परिक्षेत 500 पैकी 482 गुण मिळवत यश चंद्रशेखर अडसुळे याने धवल यश प्राप्त केले आहे. वडी, (ता.खटाव) येथील चंद्रशेखर तात्याराव अडसुळे नोकरीनिमित्त वलसाड (गुजरात) येथे राहतात. यश हा तेथील सरस्वती इंटरनॉशनल स्कूलचा विद्यार्थी आहे.
यश यास इंग्रजी विषयात 100 पैकी 95 गुण मिळाले आहेत, तर फिजीक्स 95, केमेस्ट्री 96, गणित 97 व फिजीकल एज्युकेशन विषयात त्याला 99 गुण मिळाले आहेत. विशेष बाब म्हणजे यशने एशियन ऑलिंपियाडमध्ये पण उल्लेखनीय यश संपादन केले होते.
यशचे वडील वेस्टर्न रेल्वेचे पोरबंदर विभागाचे सहायक मंडळ अभियंता पदावर काम करतात आणि त्याची आई प्रमिला या गृहिणी तर चुलते स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचे अहमदाबाद विभागाचे विभागीय वरिष्ठ व्यवस्थापक आहेत.
या यशाबद्दल त्याचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular