Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीऔंध पुसेसावळी परीसरात रमजान ईद उत्साहात साजरी

औंध पुसेसावळी परीसरात रमजान ईद उत्साहात साजरी

औंध: औंधसह पुसेसावळी आणि परीसरात रमजान ईद मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. ईदनिमित्त नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी विश्वशांती साठी प्रार्थना केली.
मंगळवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्या नंतर परीसरातील मुस्लिम समाजात अतिशय आनंदाचे वातावरण होते. सर्वानी ईदची जोरदार तयारी केली होती. बाजारपेठेत शिरखुर्मा व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी मुस्लिम बांधवांंची गर्दी झाली होती.
बुधवारी औंध येथील इदगाह मैदानावर सकाळी 9 वाजता हाफिज अब्दुल वहाब मुजावर यांनी सामुदायिक नमाज पठन केले. पुसेसावळी येथे रफिक इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठन करण्यात आली. तसेच वडी येथील मस्जिद मध्ये हाफिज हामजेखान मुलाणी यानी नमाज पठन केले. यावेळी मुस्लिम बांधवांनी देशाची अखंडता कायम रहावी पाऊस पडून दुष्काळाचे भीषण संकट दूर होऊन सर्वत्र सम्रुध्दी निर्माण व्हावी अशी इश्वराकडे प्रार्थना केली. नमाज पठन झाल्यावर मुस्लिम बांधवांनी गळाभेट देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मित्र परीवार नातेवाईक यांना निमंत्रण देऊन शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला. व उत्साही वातावरणात ईद साजरी केली.
ईद निमित्त माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, वर्धन अँग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम, समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड, जिल्हा परिषद सदस्या सुनिता कदम, माजी सभापती संदीप मांडवे, चंद्रकांत पाटील, जितेंद्र पवार, सुरेशबापू कदम, संतोष घार्गे, जयश्री कदम, रेखा घार्गे, सचिन कदम, सपोनि सुनील जाधव, सरपंच सोनाली मिठारी, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने उपसरपंच दीपक नलावडे, नवल थोरात, रमेश जगदाळे, अनिल सुर्यवंशी, सोमनाथ सावंत, सतिश जाधव यांनी प्रत्यक्ष भेटून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular