औंध: औंधसह परिसरास शुक्रवारी सायंकाळी वादळी वारे,वीजांच्या कडकडाटांंसह पावसाने झोडपून काढले. पावसाने हजेरी लावल्याने कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान वारंवार औंध परिसरात होणार्या वीजांच्या मोठ्या आवाजामुळे खळबळ उडाली आहे.शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास औंधसह परिसरातील गोपुज,गोसाव्याची वाडी व अन्य गावात सुमारे अर्धा तास पावसाने हजेरी लावली.
ठिकठिकाणी मोठ्या झाडांच्या फांद्या तसेच औंध-गोपुज रस्त्यावर एक झाड उन्मळून पडले आहे, गोपुज येथे विजेच्या तारांचा ताण तुटल्याने रोडपासून केवळ पाच फुटांच्या उंचीवर तारा लोबकळत होत्या,रात्री उशीरापर्यंत ढगाळ वातावरण व वीजांचा कडकडाटाचे थैमान सुरू होते.
औंध परिसरात पावसाची अर्धा तास हजेरी
RELATED ARTICLES