Thursday, June 19, 2025
Homeसातारा जिल्हाजावळीशिष्यवृत्ती परीक्षेत भणंग शाळेच्या संस्कार गणेश जगताप याचे यश

शिष्यवृत्ती परीक्षेत भणंग शाळेच्या संस्कार गणेश जगताप याचे यश

मेढा प्रतिनिधी -शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भणंग येथील संस्कार गणेश जगताप याने २४२ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.त्याला वर्गशिक्षिका आशा रविंद्र साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.तसेच मुख्याध्यापक डी.टी.धनावडे, अशोक लकडे, उषाकिरण धनावडे, शंकर ओंबळे,विश्वास भिसे यांनी विशेष सहकार्य केले.
या यशाबद्दल शिक्षण विभाग, पंचायत समिती जावली आणि केंद्र व शाळा भणंग यांच्यावतीने शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी संस्कार गणेश जगताप व मार्गदर्शक शिक्षिका आशा रविंद्र साळुंखे,मुख्याध्यापक डी.टी.धनावडे यांचा शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल,चंद्रकांत कर्णे,केंद्रप्रमुख संपत धनावडे यांनी शाल,श्रीफळ,शैक्षणिक साहित्य,गुलाबपुष्प,खाऊ देऊन गौरव केला.
भणंग शाळेतील संस्कार गणेश जगताप याने शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे जावलीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल,चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख संपत धनावडे,भणंग गावचे सरपंच गणेश जगताप, उपसरपंच हाफिजा मोमीन,हनुमान उदय मंडळाचे अध्यक्ष जोतिराम जाधव,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,ग्रामस्थ,विद्यार्थी व शिक्षक यांनी अभिनंदन केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular