भुईंज: साखरेचे वाढलेले प्रचंड उत्पादन पाहता साखरेला जादा दर मिळणे कठीण आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी ऊसाच्या रसापासून इथेनॉल, अल्कोहोल उत्पादनावर भर द्यायला हवा. यासाठी किसन वीरफचे सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे, अशा शब्दात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी मदन भोसले यांच्या प्रयत्नांना दाद दिली.
किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांची नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली. त्या भेटीत साखर उद्योगातील विविध सहप्रकल्प, दुष्काळी परिस्थिती आणि एकुणच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा केली. या चर्चेत मदन भोसले यांनी दहा वर्षापुर्वीच किसन वीर कारखान्याने बी हेवी इथेनॉल निर्मितीचा प्रयोग केला होता. तो प्रयोग संपुर्ण देशातील पहिला प्रयोग होता. हाच धागा पकडून नामदार नितीन गडकरी म्हणाले, या प्रश्नाबाबत केंद्राने धोरण जाहिर केले आहे. मात्र तत्पुर्वीच तुम्ही काळाची पाऊले ओळखुन बी हेवीपासून इथेनॉल उत्पादन सुरू केले, ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. इथेनॉलला जादा दर देण्याचे काम प्रथमच झालेले आहे. कधी नव्हे तो इथेनॉलला मिळालेला जादा भाव हा इथेनॉलचा इंधनातील वापर वाढविला गेल्याने शक्य झाला आहे. नजिकच्या काळात इथेनॉलचा वापर अधिकाधिक वाढविला जाणार असून त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकर्यांना निश्चितपणे होणार आहे. यासोबतच ऊसाच्या रसापासून अल्कोहोल निर्मितीचे प्रयोगही यशस्वी झाला असून त्याबाबतही तुम्ही तातडीने विचार करायला हवा. साखरेऐवजी आता अशा प्रयोगांकडे वळण्याशिवाय पर्याय नाही. नविन साखर कारखाने उभारणे आता अजिबात हिताचे नाही, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. यावेळी किसन वीर कारखान्याच्या सीएनजी प्रकल्पाचीही नितीन गडकरी यांनी माहिती घेतली. तसेच सीएनजीबाबत अधिक प्रयोग करायला वाव असून याबाबतही किसन वीर परिवाराने प्रयत्न करावेत. साखरेला उत्तम पर्याय होणार्या अशा सर्व उपक्रमांसाठी मी स्वतः मदनराव तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन. ङ्गमाझं किसन वीर कारखान्यावर यायचं राहून गेलं आहे, त्यामुळे नजिकच्या काळात नक्की येऊन जाईन. तुम्हीदेखील मला वरचेवर भेटत जावा, असेही नामदार नितीन गडकरी यांनी मदन भोसले यांना आग्रहपुर्वक सांगितले.
यावेळी किसन वीर कारखान्याचे तांत्रिक सल्लागार अनिल जाधव, कारखान्याचे संचालक नवनाथ केंजळे उपस्थित होते.
विदर्भ डिझेलमुक्त करणार
जैविक इंधन आणि सीएनजी याची उपलब्धतता मोठ्या प्रमाणावर करून नजिकच्या काळात संपुर्ण विदर्भ डिझेलमुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे. प्रायोगिक तत्वावर विदर्भात हा प्रयोग केला जाणार असून तो यशस्वी झाल्यानंतर त्याची व्याप्ती वाढविली जाणार आहे.
तसेच सांडपाण्यावर आधारीत विविध प्रकल्प राबविण्याचे प्रयोग यशस्वी झाले असून त्यालाही चालना दिली जाणार आहे, असेही नामदार गडकरी यांनी मदन भोसले यांना सांगितले.
साखर उत्पादनाऐवजी इथेनॉल निर्मिती हिताची: ना.नितीन गडकरी
RELATED ARTICLES