भुईंज : ऋषीपंचमी निमित्त भुईंजच्या कृष्णा नदीच्या काठावर आचार्य भृगूऋषीमठात महिला भाविकांची गर्दी. श्री क्षेत्र नारायणपूर येथील विश्वचैतन्य प.पू.श्री.सद्गुरू नारायण महाराज ह्यआण्णाहृ यांच्या कृपाशिर्वादाने ऋषीपंचमीचा उपवासाच्या महाप्रसादाने ऋषीपंचमीचा महिमा जोपासण्यासाठी राज्यभरातून आलेल्या महिलांच्या गर्दीने अवगा कृष्णा काठ धन्य झाला.
प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थी नंतर दुर्सयाच दिवशी येणारी ऋषीपंचमी हा महिलांच्या वृतवैकल्याचा सोहळा साजरा करण्यात येतो. याही वर्षी हा सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
पहाटेपासूनच कृष्णा नदीच्या काठावर महिला भाविकांनी स्नानपर्वणीसाठी गर्दी केली होती.देवी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन भृगूऋषी मठावर समाधी स्थळ व उत्सवमूर्ती समोर अभिषेक़ आरती झाल्यानंतर उपवासाच्या भात भाजीचा महाप्रसाद घेऊन महिलांनी हा ऋषीपंचमीचा उत्सव साजरा केला.
श्री क्षेत्र नारायणपूर येथील शिष्यपरिवार यांनी पौरोहित्य केले. भृगूमठ सेवेकरी़ दत्त सेवेकरी़ ग्रामपंचायत भुईंज यांनी शिस्तबद्ध नियोजन केले होते.
भुईंज येथे ऋषीपंचमी निमित्त महिला भाविकांची अलोट गर्दी
RELATED ARTICLES